Join us

Maka Lagavd मका लागवड करताय? लवकर पक्व होणारे वाण कोणते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 2:33 PM

maize variety महाराष्ट्रात मका तृणधान्य म्हणून रब्बी व खरीप हंगामात घेतली जाते. यात काही मकेचे वाण तृणधान्य म्हणून जे कि पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते.

महाराष्ट्रात मका तृणधान्य म्हणून रब्बी व खरीप हंगामात घेतली जाते. यात काही मकेचे वाण तृणधान्य म्हणून जे कि पशुखाद्य व कुक्कुट खाद्य आणि प्रक्रिया उद्योगात वापरली जाते, तर काही वाण जनावारंचा चारा तसेच काही बेबी, स्वीट, पॉप कॉर्न म्हणून घेतले जातात.

मकेच्या वाणानुसार त्याचा पक्व होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. मका पिकाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत व प्रकारानुसार त्याचे विविध वाण आहेत.

मक्याचे विविध प्रकारउपयोगवापर
साधा मकातांबडा, पिवळा, पांढरा मकाअन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्रीखाद्य, मूल्यवर्धित पदार्थ
गुणात्मक प्रथिनेयुक्त मकाQPM प्रथिनेअन्नधान्य, मूल्यवर्धित खाद्य पदार्थ
चाऱ्यासाठी मकाहिरवा चारा किंवा मूर घास बनवणेसाठीमूल्यवर्धित खाद्य पदार्थ, पशुखाद्य
बेबी कॉर्नसूप, लोणचे, भजीपंचतारांकीत हॉटेल
पॉप कॉर्नलाह्यासाठीमुल्यवर्धित खाद्य पदार्थ
स्वीट कॉर्न (मधू मका)कणसे उकडून, भाजून खाण्यासाठीअन्नधान्य

सुधारित वाण : महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या काही मक्याच्या संमिश्र व संकरीत वाणांची माहिती खालीलप्रमाणे

संकरीत वाणअ) उशिरा पक्क होणारे वाण (१०० ते ११० दिवस)१) बायो-९६८१वैशिष्ट्ये: पिवळा दाणासरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ६० ते ७०

२) एच क्यु पी एम-१वैशिष्ट्ये: पिवळा दाणा, अर्ध खळीदार, गुणात्मक संकरीत वाण, करपा व खोडकिडीस प्रतिकारक.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ६० ते ६५

३) एच क्यु पी एम-५वैशिष्ट्ये: नारंगी दाणा, गुणात्मक संकरीत वाण, करपा व खोडकिडीस प्रतिकारक.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ५५ ते ६०

४) संगमवैशिष्ट्ये: नारंगी दाणासरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ७५ ते ८०

५) कुबेरवैशिष्ट्ये: नारंगी पिवळा दाणा सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ७५ ते ८०

ब) मध्यम कालावधीत पक्क होणारे वाण (९० ते १०० दिवस)१) राजर्षीवैशिष्ट्ये: नारंगी पिवळा दाणा, करपा व खोडकिडीस प्रतिकारक, खरीप व रब्बी हंगामात योग्य.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ७० ते ७५ (खरिप) आणि ९५ ते १०० (रब्बी)

२) बायो-९६३७वैशिष्ट्ये: नारंगी दाणासरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ७० ते ७५

३) फुले महर्षीवैशिष्ट्ये: नांरगी पिवळा दाणा, अर्ध खळीदार, खरीप हंगामात योग्य.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ७५ ते ८०

क) लवकर (८० ते ९० दिवस) व अति लवकर पक्क होणारे वाण (७० ते ८० दिवस)१) पुसा संकर मका-१वैशिष्ट्ये: नारंगी पिवळा दाणा, खरीप हंगामात योग्य.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ४० ते ५०

२) विवेक संकरीत मका-२१वैशिष्ट्ये: पिवळा दाणा, अर्ध खळीदार.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ४५ ते ५०

३) विवेक संकरीत मका-२७वैशिष्ट्ये: पिवळा दाणा, अर्ध खळीदार.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ५० ते ५५

४) महाराजावैशिष्ट्ये: नारंगी दाणासरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ६० ते ६५

ड) संमिश्र वाण उशिरा पक्व होणारे वाण (१०० ते ११० दिवस)१) आफ्रिकन टॉलवैशिष्ट्ये: हिरव्या चाऱ्यासाठी उत्तम, पाने लांब, १० ते १२ फूट उंच, करपा रोगास प्रतिकारक.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) ६० ते ७० टन हिरवा चारा (४० ते ५० क्वि. धान्य)

२) मधु मका वाण: फुले मधूवैशिष्ट्ये: साखरेचे प्रमाण (ब्रिक्स) १४.८९%. हिरवी कणसे ८० ते ८५ दिवसात काढणीस तयार होतात.सरासरी धान्य उत्पादन (कि./हे.) खरीप - १२५ ते १३० कि.हे. हिरवे कणसे आवरणसहीत.

अधिक वाचा: Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत

टॅग्स :मकापीकलागवड, मशागतशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन