विविध प्रकारच्या तृणधाण्यामध्ये प्रथिने, कार्बोदके, जिवनसत्वे त्याच बरोबर खजिने ही विपुल प्रमाणात असतात. इ. एम. द्रावणाच्या साह्याने या धान्याची उत्कृष्ठ स्लरी बनवता येते.
फायदे
१) या मुळे मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्याचीही उपलब्धता होते.
२) या स्लरीचा वारंवार वापर केल्यास जमिनीतील उपयुक्त सुक्ष्म जिवांचे प्रमाण वाढते.
३) पिकांच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते.
सप्त धान्य स्लरी तयार करण्याची कृती
बाजरी २५० ग्रॅम, ज्वारी २५० ग्रॅम, मका २५० ग्रॅम, नाचणी २५० ग्रॅम, वरई २५० ग्रॅम, सोयाबीन २५० ग्रॅम, उडीद २५० ग्रॅम, या धान्यांचा भरडा + इ. एम. द्रावण २० लिटर गोमुत्र १० लिटर + गुळ २ किलो + पाणी १४० लिटर हे द्रावण दिवसातून ३ वेळा ढवळावे किंवा ब्लोअरच्या साह्याने एक तास सकाळ दुपार संध्याकाळ हवा द्यावी. ५ दिवसानी हे द्रावण वापरण्यासाठी तयार होते.
सप्त धान्य स्लरी कशी वापरावी?
ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब, फळभाज्या इत्यादीसाठी २०० लिटर सप्तधान्य स्लरी एकरी पाटपाण्याने किंवा ड्रिपमधून गाळून सोडावी. पिकाच्या वाढीच्या व फुले येण्याच्या अवस्थेत हि स्लरी दिल्यास फायदेशीर असते.
अधिक वाचा: Decomposer Solution; सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद करणारे हे द्रावण तयार करा घरच्याघरी