गो कृपा अमृतम् बॅक्टेरियल कल्चर पूर्णपणे नैसर्गिक सामग्रीपासून तयार केलेले आहे ज्यामध्ये पंचगव्य (गोमुत्र, गोमय, दूध, दही आणि तूप) आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
कसे बनवाल?
- एका स्वच्छ ड्रम मध्ये २०० लिटर पाणी घ्या जे नैसर्गिक पद्धतींनी स्वच्छ केलेले असेल आणि ज्यामध्ये तेल किंवा रसायनांचा अंश नसेल.
- एका बादलीत थोडे पाणी घ्या आणि त्यात २ किलो नैसर्गिक देशी गूळ मिसळा. हे मिश्रण २०० लिटर पाण्यात मिसळा.
- यामध्ये १ लिटर गो कृपा अमृतम् कल्चर आणि देशी (स्वदेशी) गोमातेच्या दुधापासून मिळवलेले २ लिटर ताजे ताक मिसळा. (ताक बनवण्याची पद्धत-देशी गोमातेच्या दुधापासून तयार केलेल्या १ लिटर ताज्या दह्यामध्ये २ लिटर पाणी घाला. ते चांगले घुसळून घ्या, लोणी बाजूला काढा, उरलेले ताक गो आधारित शेतीसाठी आदर्श आहे.)
- हे द्रावण सुती कापडाने झाकून ठेवा आणि शक्यतो झाडाच्या किंवा हिरव्या जाळीच्या सावलीत हे ठेवून द्या. ५-७ दिवस एका स्वच्छ लाकडी काठीने हे द्रावण दिवसातून एकदा घड्याळाच्या दिशेने १ मिनिटासाठी नीट ढवळून घ्या. कृपया या द्रावणामध्ये पावसाचे पाणी जाऊ देऊ नका. ५-७ दिवसात २०० लिटर वापरण्यायोग्य द्रावण तयार होईल.
- लाकडी काठीने ढवळणे अडचणीचे वाटत असल्यास, तुम्ही लहानशी स्वस्त मशीन खरेदी करू शकता जी माशांच्या टँकमध्ये हवा पंप करण्यासाठी वापरली जाते. या मागनि, ५-७ दिवसांपेक्षा कमी वेळात द्रावण तयार होईल.
- वरील २०० लिटर बॅक्टेरियल द्रावणाचा वापर नैसर्गिक आणि शक्तिशाली खत तयार करण्यासाठी तसेच वनस्पतींचे रोग आणि कीटक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. या द्रावणामध्ये जिवंत बॅक्टेरियल कल्चर असते आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात हे वाढवू शकतो.
- जेव्हा हे द्रावण संपायला येते किंवा अर्ध्याहून कमी शिल्लक राहते तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये २ किलो नैसर्गिक देशी गूळ आणि देशी गोमातेच्या दुधापासून मिळवलेले २ किलो ताजे ताक आणि पाण्याचे मिश्रण घाला आणि द्रावण वाढवा. अशा प्रकारे, तुम्ही घरी किंवा तुमच्या शेतात स्वतः द्रावण तयार करू शकता.
- हे द्रावण तुम्ही ७ दिवस, १ महिना, २ महिने किंवा ६ महिन्यांनंतर देखील वापरू शकता. आम्ही ते १ वर्षानंतर देखील वापरले आहे आणि याचा प्रभावीपणा कमी होत नाही. जर झाडाच्या सावलीत हे द्रावण वापर न करता पडून असेल तर तुम्हाला दर महिन्याला १ किलो देशी गूळ आणि १ लिटर ताक यांचे मिश्रण यामध्ये मिसळावे लागेल, जेणेकरून बॅक्टेरियांना जगण्यासाठी अन्न मिळत राहील.
- गो कृपा अमृतम् चा रंग वर्षभरात ४ वेळा बदलू शकतो. कधी कधी हे हिरवे दिसते तर कधी कधी हे काळे देखील दिसते. कधी कधी या द्रावणामध्ये लहानसे कीटक जाऊ शकतात, परंतु चाळणीने गाळून घेतल्यानंतर हे द्रावण पुन्हा वापरता येते.
- वर्षभरात अनेक वेळी या द्रावणाला वेगवेगळा वास येऊ शकतो किंवा तुम्हाला पृष्ठभागावर कधी कधी बुडबुडे अथवा फेस दिसू शकतो. परंतु काळजी करण्याचे काहीही कारण नाही आणि यामुळे द्रावणाचा प्रभावीपणा कमी होत नाही.
कृपया हे लक्षात ठेवा
आमच्याकडून किंवा इतर शेतकऱ्यांकडून बॅक्टेरियल कल्चर घेताना किंवा इतर शेतकऱ्यांसह ते शेअर करताना, कृपया कॅपमध्ये एक छिद्र ठेवा. यामुळे बॅक्टेरियांना ताज्या हवेत श्वास घेता येईल. आणि हे बॅक्टेरिया हाताळताना तुम्ही वापरत असलेली सर्व उपकरणे, जसे की, ड्रम, पंप, पाईप हे योग्यरीत्या स्वच्छ असले पाहिजेत आणि यावर रासायनिक अंश असू नयेत.
- बंसी गीर गोशाला
अहमदाबाद, गुजरात