Join us

खतांवरील खर्च टाळण्यासाठी नॅडेप कंपोस्ट बनवा; कसा भराल नॅडेप हौद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:03 PM

सेंद्रिय पदार्थापासून (वनस्पती व प्राणीजन्य) सुक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून आपल्यास उत्कृष्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पध्दती आहेत. यामध्ये इंदौर, बेंगलोर पध्दत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप खत (फॉस्फो कंपोस्ट) इत्यादीचा समावेश होतो.

सेंद्रिय पदार्थापासून (वनस्पती व प्राणीजन्य) सुक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून आपल्यास उत्कृष्ट खत तयार करता येते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पध्दती आहेत. यामध्ये इंदौर, बेंगलोर पध्दत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप खत (फॉस्फो कंपोस्ट) इत्यादीचा समावेश होतो. यापैकी आपण नॅडेप कंपोस्ट खत पद्धत पाहणार आहोत.

साहित्यशेती काडीकचरा, पालापाचोळा - १४०० ते १५००शेण किलोग्रॅम - ९० ते १०० किलोग्रॅमशेतातील बारीक गाळलेली माती - १७५० किलो (१२० टोपली)पाणी - १५०० ते २००० लिटर

हौद तयार करण्याची कृती१) चांगला पाया भरुन जमिनीवर पक्क्या विटांच्या सहाय्याने ३ मीटर लांब, १.८० मीटर रुंद व ०.९० मीटर उंच (१०४ ६ x ३ फुट) अशा आकाराचे हौद बांधावा व हौदाच्या तळाचा भाग विटा व दगड घालून टणक बनवावा.२) या नॅडेप हौदात मोकळी हवा खेळती रहावी याकरिता हौद बांधताना चारही बाजुच्या भिंतीना छिद्र ठेवावी.३) विटांच्या दोन थरांची जुळणी झाल्यानंतर तिसऱ्या थराची जुळणी करतांना प्रत्येक वीट १७.५ सेमी (७ इंच) रिकामी जागा सोडुन जुळणी करावी म्हणजे चारही बाजूला १७.५ सेमी अंतराचे छिद्र तयार होऊन त्यातून मोकळी हवा खेळू शकेल. यामुळे काडीकचरा, पालापाचोळा कुजण्याची क्रिया चांगली होते.४) हौदाच्या भिंतीची जाडी २२.५ सेमी (९ इंच) असावी. विटांची जुळवणी व बांधकाम मातीत करावे.५) पहिल्या ओळीच्या दोन छिद्राच्या मध्ये दुसऱ्या ओळीचे छिद्र व दुसऱ्या ओळीच्या छिद्रामध्ये तिसऱ्या ओळीचे छिद्र येईल. या पध्दतीने जुळणी करावी. अशा प्रकारे ३, ६ व ९ या थरामध्ये छिद्र तयार होईल. हौदाच्या आतील व भुपष्ठाचा भाग शेण व मातीच्या मिश्रणाने लिपून वाळल्यानंतर उपयोगात आणावा.

पहिला थरहौदात सेंद्रिय काडीकचरा भरण्याचे काम सुरु करण्यापूर्वी टाक्याच्या आतील भिंती व तळ शेण व पाणी यांचा धोळ करुन ओल्या कराव्यात. काडीकचरा व पालापाचोळा, देठ, मुळे इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थाचा १५ सेमी चा (६ इंच) थर टाकावा.दुसरा थर१२५ लिटर पाणी व ४ किलो शेण यांचे मिश्रण पहिल्या काडी- कचऱ्याच्या थरावर शिंपडावे जेणेकरुन संपुर्ण वनस्पतीजन्य पदार्थ ओले होतील.तिसरा थरवाळलेली व गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या ५० टक्के (५० ते ६० किलो) याप्रमाणे शेण व पाण्याच्या मिश्रणाने ओल्या केलेल्या वनस्पतीजन्य पदार्थावर पसरावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. अशा पध्दतीने प्रत्येक वेळी ३ थर देण्याच्या पध्दतीचा अवलंब करुन हौदाच्या वर ४५ सेमी (१.५ फुट) उंच थर येतील याप्रमाणे हौद भरावे.

साधारणतः ११ ते १२ थरामध्ये हौद भरले जाते. त्यावर ७.५ सेमी (३ इंच) मातीचा थर (४०० ते ५०० किलो) टाकून त्यावर शेण व पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून टाकावे. वाळल्यानंर भेगा पडल्यास पुन्हा शेण व मातीच्या मिश्रणाने लेप द्यावा.

दुसरी भराई १५ ते २० दिवसानंतर या हौदात टाकलेले सेंद्रिय पदार्थ आकुंचन पाऊन साधारणतः २० ते २२.५ सेमी (८ ते ९ इंच) खाली दबलेली दिसून येईल. तेव्हा पुन्हा पहिल्या भराई प्रमाणेच वनस्पतीजन्य पदार्थ शेण व माती मिश्रण आणि गाळलेल्या मातीच्या थराची रचना करुन टाक्याच्या वर ४५ सेमी उंचीपर्यंत टाके भरुन पुन्हा ७.५ सेमी (३ इंच) मातीचा थर देऊन शेण व माती यांचे मिश्रणाने लिंपून बंद करावे.

काळजी• कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्याकरिता गाईचे/जनावरांचे मुत्र जमा करुन त्याचा ही उपयोग करावा.• या पध्दतीमध्ये हौद भरल्यापासून चांगले कंपोस्ट खत तयार होण्याकरिता ९० ते १२० दिवस लागतात.• तीन चार महिन्यात खत परिपक्व होऊन खताचा रंग भुरकट व खताचा दुर्गंध नाहीसा होतो. चाळणीमधून गाळलेले खत जमिनीमध्ये पेरुन द्यावे.• या टाक्यातून साधारणतः १६० ते १७५ घनफुट चाळलेले खत व ४० ते ५० घनफुट कच्चा माल मिळतो. या संपुर्ण कालावधीत पडलेल्या भेगा शेण व पाण्याच्या मिश्रणाने बुजविणे व शिंपडणे चालू ठेवणे याबाबत दक्षता घ्यावी.• आर्द्रता कायम ठेवणे याबाबत तसेच जास्त ऊन असल्यास गवत किंवा चटईने हौद झाकून ठेवावे.• कंपोस्ट खत वापरण्याची पध्दत आपणाजवळ पुरेशा प्रमाणात नॅडेप कंपोस्ट खत तयार असल्यास दरवर्षी प्रती हेक्टर ७.५ ते १२.५ टन खत पेरणीच्या १५ दिवस अगोदर पसरुन घ्यावे किंवा खताची उपलब्धता कमी असल्यास पेरणीच्या वेळी चाड्यामधून सुध्दा खत पेरुन देता येते.

टॅग्स :सेंद्रिय खतखतेशेतकरीशेतीपीक