Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

Mango Harvesting : How to harvest mangoes to avoid damage to the fruit? Read in detail | Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो.

कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये आंब्याचा हंगाम मार्च-मे या कालावधीत दिसून येतो, तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये आंब्याचा हंगाम उशिरा म्हणजेच मे महिन्यात सुरू होऊन ऑगस्टमध्ये संपतो.

आंबा फळ काढणीसाठी महत्वाचे मुद्दे

  • ज्या भागामध्ये आंबाफळेकाढणीस तयार झालेली असतील अशा ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी.
  • फळांची काढणी करतांना फळांचा देठ साधारणतः ४ ते ६ सें. मी. ठेवून काढणी करावी. म्हणजे देठातून चिक बाहेर पडून फळावर डाग पडत नाही.
  • त्यासाठी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी शोधून काढलेल्या नुतन झेल्याचा वापर करावा. त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंचा प्रवेशास प्रतिबंध होतो. शिवाय देठाजवळ फळ काळे पडत नाही.
  • आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी.
  • उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत.
  • फळांची काढणी करतांना उन्हाने डागाळलेली व पक्षांनी खाल्लेली तसेच रोग किंवा कीडग्रस्त फळे अलग काढावीत.
  • फळांची काढणी झाल्यानंतर फळांचे तापमान ३० अंश सें. पेक्षा जास्त होऊ देऊ नये.
  • फळ काढणी केल्यानंतर झाडाच्या सावलीत बांबूच्या करंड्यात किंवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये व्यवस्थित ठेवावी.
  • आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी.
  • आंबा वाहतुक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरुन करु नये.
  • फळकूज ह्या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी.
  • काढणी नंतर फळे पोटॅशियम मेटाबायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या रसायनाच्या ५० अं. सें. उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत.
  • फळांची काढणी झाल्यावर फळावर नैसर्गिक चमक टिकून राहील यांची काळजी घ्यावी. त्यामुळे फळे आकर्षक दिसतात त्यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव सुध्दा मिळतो.

अधिक वाचा: शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

Web Title: Mango Harvesting : How to harvest mangoes to avoid damage to the fruit? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.