हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. दिवसा कडक उन, मध्येच ढगाळ हवामान, रात्री पडणारी थंडी, त्यातही सातत्य नसल्याने तुडतुडा, कीडरोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावर झाला आहे.
शिवाय मोहर/फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाल्याने फळगळती संकटही ओढावले आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
संमिश्र हवामानामुळे तुडतुड्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. कीटकनाशक फवारणीनंतर १५ ते १६ दिवसांत पुन्हा तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.
१) तुडतुडेवाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था १० तुडतुडे प्रती पालवी/मोहोर) ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी.उपाययासाठी मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. किंवाब्युफ्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. प्रति १० लिटर पाणी आणि मोहोर फुलल्यानंतर फळे वाटणा आकाराची असताना थायोमेथोक्झाम २५ टक्के दाणेदार १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) फुलकिडीवाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोहोर व फळांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.किडीची ओळख- ही किड आकाराने सुक्ष्म असल्याने डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही.- या किडीचे प्रौढ पिवळे अथवा गडद चॉकलेटी रंगाचे तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात.- किडीची पिल्ले आणि प्रौढ पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडुन त्यातुन पाझरणारा रस शोषुन आपली उपजीवीका करतात.- कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो. मोहोर काळा पडुन गळुन पडतो.
उपाय१) सदर किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास नियंत्रणासाठी २.५ मिली स्पिनोसॅड ४५% प्रवाही प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.२) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास दुसरी फवारणी थायोमिथॉक्झॉम २५% डब्लु. जी. २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.३) बागेतील फुलकीड नियंत्रणासाठी बागेत गर्द निळ्या रंगाचे चिकट कागद/कार्डबोर्ड सापळे लावावेत.
टीपमोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ०९.०० ते १२.००) फवारणी करावी. किटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
अधिक वाचा: Harbhara Ghate Ali : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय