Join us

नोकरी सांभाळत शेतात फुलवली झेंडूची शेती, दसऱ्याच्या तोंडावर मिळणार लाखो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 4:00 PM

नवनवीन प्रयोगांसह शेतीला आधुनिकतेची जोड देत बहारताहेत विविध पिके.

नोकरी सांभाळत केली शेती, आई वडील पत्नी मुलं यांच्या सहकार्याने आज मिळत आहे उत्तम उत्पन्न सोबत शेती जोपासण्याचा आनंद.खर्चा बघता अल्प उत्पन्न त्यातही वेळेला पिकांना दर नाही आदी कारणास्तव ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत आई वडील, पत्नी आणि मुलांच्या सहकार्याने पारंपरिक शेतीला पर्याय देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडवाळी ता. पैठण येथील शेतकरी रमेश आघाव यांनी आपल्या १३ वर्षीय मोसंबी बागेत आंतरपीक झेंडूची फुले फुलवली.

आघाव सांगतात," मला एकूण पाच एकर शेती आहे त्यात पारंपरिक शेती करायची म्हंटलं तर नफा कमी आणि तोटा अधिक हेचं लहानपणा पासून बघत आलोय यावर कुठेतरी उपाय काढावा असं नेहमी भासायचं. यातून २०१३-१४ साली दोन एकर क्षेत्रात मोसंबीच्या बागेची लागवड केली. ती जोपासत असतांना अर्धा एकर क्षेत्रांवर पाण्याच्या उपलब्धतेकरिता शेततळे उभारले. सोबतच अर्धा एकर चार वर्षांपूर्वी निंबोनीची बाग देखील केली. तसेच गेल्या वर्षीपासून मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून यशस्वी झेंडूची शेती करत आहे."

उत्पन्न खर्च व नफा -दोन एकर मोसंबी बागेत एकूण ३५० झाडे असून त्याद्वारे वार्षिक ७ ते ८ टन उत्पादन मिळते यास फवारणी खते यांचा सरासरी वार्षिक २० हजार खर्च वजा जाता १ लाख निव्वळ नफा मिळाल्याचे आघाव यांनी सांगितले. तर निंबुनी बाग नवीनच असल्याने उत्पन्न अध्याप कमी असून पंचवीस हजार रुपयांचे निंबु विक्री झाले तर वार्षिक खत व औषधी यांचा खर्च साधारण ५ हजार आला.  झेंडूसाठी ३० हजार रुपयांची १० हजार रोपे तसेच खुरपणी कीटकनाशके, खते आदींचा मिळून ५० हजार खर्च तर दसरा आणि दिवाळी अश्या दोन तोड्यात सरासरी ५ टन अपेक्षित उत्पादन असून ४० ते ५० चा मिळेल अशी अपेक्षा लक्षात घेता खर्च वजा जाता २ लाखांचे उत्पन्न मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

ड्रोन द्वारे फवारणीचा प्रयोग  -आघाव यांनी मोसंबीच्या तोड्यानंतर झाडाला पुन्हा नव्याने ऊर्जा मिळावी किटकांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच झेंडू च्या फुलांवर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये किटक होऊ नये म्हणून कीटकनाशक व सुश्म पोषक द्रवांची नुकतीच फवारणी केली आहे. ज्यासाठी आघाव यांनी यावर्षी ड्रोनद्वारे फवारणी घेतली. ज्यातून वेळ वाचला मजुरांची गरज भासली नाही तसेच अल्प खर्चात एकरी ७०० रुपये खर्चात ही फवारणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

रविंद्र शिऊरकर

टॅग्स :शेतकरीकाढणीफुलशेती