Lokmat Agro >स्मार्ट शेती > खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

millipedes pest management in kharif Crops | खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

खरीप पिकांतील पैसा/वाणी किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

शेअर :

Join us
Join usNext

काही भागांमध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकावर पैसा/वाणी म्हणजेच मिलीपीड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.

मिलीपीड ही एक निशाचर कीड असून सामान्यतः सडणारी पाने तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करते साधारणपणे निसर्गात यांची भूमिका कुजलेल्या काडी कचरा विघटन करण्यास मदत करणारा प्राणी अशी आहे.

परंतु जेव्हा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणारे रोपटे, अंकुरलेले बियाण्यांना खाऊन नुकसान करतात, जमिनीलगत रोपे कुरतडून टाकतात. पैसा/वाणी किडींनी कुरतडल्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. शेतकरी बांधवांनी जागरूक राहून पिकाचे निरीक्षण करून किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.

जीवनक्रम
मिलीपिडचे किडीच्या अंडी, अळी व प्रौढ या अवस्था आढळून येतात. अंडी जमिनीत काही इंच खोलीवर टाकली जातात. एक मादी साधारणपणे ३०० च्या जवळपास अंडी घालते. अळीच्या ऐकून पाच अवस्था आढळून येतात. प्रौढ अवस्था हि प्रदीर्घ काळाची आहे. संपूर्ण जीवनक्रम हा पाच ते सात वर्षात पूर्ण होतो. या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आद्रता असणे आवशक आहे त्यामुळे पावसाळ्यात किंवा जिथे ओलिताची सोय आहे अश्या ठिकाणी हि कीड जास्त सक्रीय असते. हवामान अनुकूल नसल्यास हि कीड जमिनित सुप्त अवस्थेत राहते

एकात्मिक व्यवस्थापन
१) शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काडी कचरा गोळा करुन नष्ट करावा. वाणी रात्री सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.
२) शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करुन बांधावरील गवत व दगड काढून बांध मोकळा ठेवावा बऱ्याचदा आर्द्रता, घनदाट पिकात जास्त पाणी दिल्यामुळे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास वाणीचा प्रादुर्भाव वाढतो.
३) जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात.
४) ज्याठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपुर्वी बियाण्याला बिजप्रक्रीया केली आहे तेथे वाणीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
५) पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील.
६) चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.

रासायनिक व्यवस्थापन
ही कीड संपूर्ण शेतात पसरली असल्यास क्लोरोपायरीफॉस दहा टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३% दाणेदार या यापैकी कोणत्या एका कीटकनाशकाची निवड करून पाच किलो प्रति हेक्टर १०० किलो शेण खतात मिसळून ओळीने शेतातील रोपाजवळ वापर करू शकता (या कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी स्थानिक तज्ञांचा सल्ला घेऊन लेबल क्लेम शिफारसी प्रमाणेच व लेबल क्लेम शिफारस तपासूनच गरज असेल तरच वापर करावा) 

अधिक वाचा: Tur तूर पिकात मर रोग येऊन द्यायचा नसेल तर पेरणी अगोदर करा ह्या उपाययोजना

Web Title: millipedes pest management in kharif Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.