Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

Mitrakidi : Read more about exactly how insect friend works in pest control | Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत.

जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

'जीवो जीवश्चः जीवम्' या युक्ती प्रमाणे एक सजीव दुसऱ्या सजीवावर उपजीविका करतो. निसर्गात किडींनादेखील शत्रू असतात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.

जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत.

अशा उपयुक्त जैविक नियंत्रणामध्ये योगदान देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हानिकारक व मित्रकीटक यांच्यातील गफलत टाळण्यासाठी त्यांची आपल्याला ओळख असणे आवश्यक आहे.

परोपजीवी किडे
-
हे किडे आपल्या आयुष्याचा बराचसा काळ दुसऱ्या किड्यांच्या अंगावर किंवा त्यांच्या शरीरात घालवतात.
- हे किडींच्या शरीरात किंवा शरीरावर अंडी घालतात.
- त्यातुन निघालेल्या अळ्या भक्ष्य किडीला खातात त्यामुळे ते पिकांसाठी त्रासदायक मोठ्या किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगाचे ठरतात.
- परोपजीवी किडे त्यांच्या भक्ष किडीहून आकाराने खुप लहान असल्यामुळे आणि त्यांची अंडी व बाल्यावस्था भक्ष्य किडींच्या शरीरात असल्यामुळे केवळ बघुन त्यांना ओळखण कठीण जात.

परभक्षी मित्र किडे
-
हे किडे इतर लहान किंवा पूर्ण वाढ झालेल्या किड्यांना खातात.
- परभक्षी किडे आकाराने त्यांच्या भक्ष्य किडींपेक्षा मोठे असतात.
- किडीवरील सूक्ष्म रोगजंतू काही सूक्ष्मजंतू जसे जीवाणू, विषाणू, बुरशी इत्यादी कीटकांना रोगग्रस्त करतात, त्यामुळे ते कीटक मारतात.
- जैविक नियंत्रणासाठी उपयोगी असणारे निवडक परोपजीवी, भक्षक कीटक, जीवाणू आणि विषाणू प्रयोगशाळेत वाढविता येतात.
- क्रायसोपा व लेडीबर्ड बीटल या भक्षक कीटकांचा, एच.ए.एन.पी.व्ही विषाणूचा व बीटी या जीवाणूचा वापर करता येईल.

मित्र कीटकांचे जतन
-
शेताच्या कडेने फुलांची पिके लावणे मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुर्यफुल, चवळी, झेंडु यासारखी पिवळ्या फुलांची झाडे लावावीत.
- पिवळ्या व पांढऱ्या फुलांच्या पिकांच्या ओळीमुळे मित्र कीटकांची संख्या काही पटींनी वाढल्याचे लक्षात आले आहे.
- कृषि विद्यापीठ, संशोधन संस्थांमार्फत मित्र किटक प्राप्त करुन शेतात सोडावेत.
- सुरुवातीलाच घातक कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मित्र कीटक पण मारली जातात.
- निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क फवारणीमुळे मित्र कीटकांवर ऐवढा अनिष्ट परिणाम होत नाही.

Web Title: Mitrakidi : Read more about exactly how insect friend works in pest control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.