Join us

Mosambi and Santri Crops: मोसंबी व संत्रा पिकावरील कोळी किडींवर या करा उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:14 IST

Mosambi and Santri Crops: मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक आहे. तर परभणी जिल्ह्यात संत्रा बागा आहेत. हवामानात झालेल्या बदलामुळे आता मोसंबीवर कोळी किडींचा (spider mites) प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावरील उपायायोजना काय आहेत ते वाचा सविस्तर (Mosambi and Santri Crops)

Mosambi and Santri Crops : मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक आहे. तर परभणी जिल्ह्यात संत्रा बागा आहेत. हवामानात झालेल्या बदलामुळे आता मोसंबीवर कोळी किडींचा (spider mites) प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावरील उपायायोजना काय आहेत ते वाचा सविस्तर (Mosambi and Santri Crops)

मोसंबीवर कोळी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र असून, येथे संत्र्यांवर कोळी कीड दिसून येत आहे. अन्य जिल्ह्यातही लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. (Mosambi and Santri Crops)

प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य त्या उपाययोजन कश्या कराव्यात ते वाचा सविस्तर

प्रादुर्भावाची लक्षणे

* कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात.

* परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो.

* फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी 'लाल्या' म्हणून ओळखतात.

असे करा व्यवस्थापन

* कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो.

* प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो.

* पाण्याचा ताण पडू देऊ नये.

* निंबोळी अर्क (५%) किंवा अझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

* रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायफेनथीयूरोन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

(सौजन्य : फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर: Krushi Salla: उन्हाळी भुईमूग पिकांसह फळबागांचे असे करा व्यवस्थापन; वाचा कृषी सल्ला सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफळेशेतकरीशेती