Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा

Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा

Mosambi Pik Vima Yojana : How and how much crop insurance to pay for hail in Mosambi fruit crop | Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा

Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.

मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (‍रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. 

मोसंबी पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

 संरक्षित रक्कम रु.शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.
नियमित विमा१,००,०००/-५,०००/-
गारपीट३३,०००/-१,६५०/-

हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)

१) अवेळी पाऊस (दि. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर)
अ) या कालावधीमध्ये सलग ४ दिवसात एकूण ३० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रु. १६,६२५/- देय होईल.
ब) या कालावधीमध्ये सलग ५ दिवसात एकूण ३५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. २६,६२५/- देय होईल.
क) या कालावधीमध्ये सलग ६ दिवसात एकूण ४० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. ३३,२५०/- देय होईल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये ३३,२५०/- देय होईल.)

२) जास्त तापमान (दि. १ मार्च ते ३१ मार्च)
या कालावधीमध्ये दैनंदिन तापमान ३९ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालीलप्रमाणे नुकसान भरपाई देय राहील. 
सलग ३ दिवस रु. ६,७००/-
सलग ४ दिवस रु. १३,३७५/-  
सलग ५ दिवस रु. २०,०००/-
सलग ६ दिवस रु. २६,७५०/-
सलग ७ दिवस रु. ३३,५००/-  
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये ३३,५००/- देय होईल.)

३) जास्त पाऊस (दि. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर)
अ) या कालावधीमध्ये सलग ७ दिवसात एकूण १५० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये १३,२५०/- देय होईल.
ब) या कालावधीमध्ये सलग ७ दिवसात एकूण १७५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये २०,८७५/- देय होईल.
क) या कालावधीमध्ये सलग ७ दिवसात एकूण २०० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये ३३,२५०/- देय होईल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये ३३,२५०/- देय होईल.)

गारपीटसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४

संपर्क
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in 
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

अधिक वाचा: कागदी लिंबाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी कोणता बहार धरावा वाचा सविस्तर

Web Title: Mosambi Pik Vima Yojana : How and how much crop insurance to pay for hail in Mosambi fruit crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.