मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये टपोरे दाणे असलेले, रोग प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणारा वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहे.
मुगाच्या सुधारीत जाती
१) कोपरगांव
- हा वाण म.फु.कृ.वि. राहुरी येथुन प्रसारीत झाला.
- हे वाण ६५ ते ७० दिवसामध्ये तयार होते.
- मर व करपा (ब्लाईट) पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे.
- मध्यम आकाराचा हिरवा रंगाचा व चमकदार असुन १०० दाण्याचे वजन ३ ते ३.२ ग्रॅम असते.
- या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते १० किं/हे. मिळते.
२) बीएम २००२-१
- हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २००५ मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.
- हे वाण ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ७-९ क्विंटल उत्पादन मिळते.
- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ३.७५ ग्रॅम एवढे आहे.
- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.
- शेंगा या टोकदार व केसाळ असून जमिनीकडे झोपळलेल्या असतात.
- हे वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
३) बीएम २००३-२
- हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २०१० मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.
- हे ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ८-१० क्विंटल उत्पादन मिळते.
- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ४.५० ग्रॅम एवढे आहे.
- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.
- शेंगा या लांब असून दाणे हे मोठ्या आकाराचे व चमकदार असतात तसेच हा वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
४) फुले मुग २
- हा वाण ६०-६५ दिवसात येणारे असुन त्याचे उत्पादन १०- १२ किंटल/हे. असे आहे.
- या वाणाचे दाणे मध्यंम आकाराचे व हिरव्या रंगाचे आहे.
- हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य असुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी प्रसारीत केलेला आहे.
५) पी.के.व्हि. ए.के.एम ४
- हा वाण डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांनी प्रसारीत केला आहे.
- अधिक उत्पादन देणारा, मध्यंम आकाराचे दाणे असणारा, एकाच वेळी पक्वता येणारा आहे.
- बहुरोग प्रतिकारक आहे.
- संपुर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे.
- हा वाण ६५-७० दिवसात येणारा आणि १२/१५ क्विं./हे. उत्पादन देणारा आहे.
अधिक वाचा: Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?