मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये टपोरे दाणे असलेले, रोग प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणारा वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहे.
मुगाच्या सुधारीत जाती१) कोपरगांव- हा वाण म.फु.कृ.वि. राहुरी येथुन प्रसारीत झाला.- हे वाण ६५ ते ७० दिवसामध्ये तयार होते.- मर व करपा (ब्लाईट) पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे.- मध्यम आकाराचा हिरवा रंगाचा व चमकदार असुन १०० दाण्याचे वजन ३ ते ३.२ ग्रॅम असते.- या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते १० किं/हे. मिळते.
२) बीएम २००२-१- हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २००५ मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.- हे वाण ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ७-९ क्विंटल उत्पादन मिळते.- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ३.७५ ग्रॅम एवढे आहे.- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.- शेंगा या टोकदार व केसाळ असून जमिनीकडे झोपळलेल्या असतात.- हे वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
३) बीएम २००३-२- हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २०१० मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.- हे ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ८-१० क्विंटल उत्पादन मिळते.- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ४.५० ग्रॅम एवढे आहे.- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.- शेंगा या लांब असून दाणे हे मोठ्या आकाराचे व चमकदार असतात तसेच हा वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
४) फुले मुग २- हा वाण ६०-६५ दिवसात येणारे असुन त्याचे उत्पादन १०- १२ किंटल/हे. असे आहे.- या वाणाचे दाणे मध्यंम आकाराचे व हिरव्या रंगाचे आहे.- हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य असुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी प्रसारीत केलेला आहे.
५) पी.के.व्हि. ए.के.एम ४- हा वाण डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांनी प्रसारीत केला आहे.- अधिक उत्पादन देणारा, मध्यंम आकाराचे दाणे असणारा, एकाच वेळी पक्वता येणारा आहे.- बहुरोग प्रतिकारक आहे.- संपुर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे.- हा वाण ६५-७० दिवसात येणारा आणि १२/१५ क्विं./हे. उत्पादन देणारा आहे.
अधिक वाचा: Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?