Lokmat Agro >स्मार्ट शेती > भात संशोधनात कोकण कृषी विद्यापीठाचे नवे पाऊल

भात संशोधनात कोकण कृषी विद्यापीठाचे नवे पाऊल

New step of Konkan Agricultural University in rice research | भात संशोधनात कोकण कृषी विद्यापीठाचे नवे पाऊल

भात संशोधनात कोकण कृषी विद्यापीठाचे नवे पाऊल

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि फिलीपाइन्स स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेशी भाताच्या संशोधना संदर्भात सामंजस्य करार

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि फिलीपाइन्स स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेशी भाताच्या संशोधना संदर्भात सामंजस्य करार

शेअर :

Join us
Join usNext

फिलीपाइन्स स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या दरम्यान भाताच्या संशोधनासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलीपाइन्सचे महानिर्देशक डॉ. अजय कोहली यांनी फिलीपाइन्स येथे सामंजस्य करार केला.

भात हे कोकणातले प्रमुख पीक असून, कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ते पिकवले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भातामध्ये भरीव संशोधन करून आतापर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार एकूण ३५ वेगवेगळ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पहिली संकरित जात तयार करण्याचा बहुमान या विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. सह्याद्री ९ ते ५ या जातींचाही समावेश होतो. या दोन संस्थांमध्ये झालेला सामंजस्य करार ही अभिमानाची गोष्ट आहे. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणिक आणि संशोधनासाठी बाह्यस्रोताची उपलब्धता आणि या संदर्भाने विविध प्रकल्प राबविणे आता सहज शक्य होणार आहे.

हा सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्जत येथील भात पेदासकार डॉ. भरत वाघमोडे यांनी पुढाकार घेतला. या करारावेळी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलीपाइन्स येथील महानिर्देशक डॉ. अजय कोहली, आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. उमाशंकर सिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उपनिर्देशक डॉ. संकल्प भोसले, दक्षिण आफ्रिकेचे संशोधन समन्वयक डॉ. अजय पंचभाई, डॉ. सुधांशू सिंग, संशोधन संचालक ईरी आणि चीनचे शास्त्रज्ञ तसेच आंतराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलीपाइन्समधील कार्यरत शास्त्रज्ञ उपस्थित होते.

फिलीपाइन्समध्ये संशोधनाची संधी
-
करारानुसार भाताच्या विविध स्थानिक वाणांचे संकलन, वैशिष्ट्य सुधारणा त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती अति ताण सहन करणाऱ्या जाती तसेच विविध किडी व रोगांना बळी पडणाऱ्या जातींवर संशोधन करण्यात येणार आहे.
- जलद संकरीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या घटकांचा संशोधनात समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठातील भातावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलीपाइन्स येथे जाऊन संशोधन करण्याची एक मोठी संधी आहे.
- संशोधनासाठी फिलीपाईन्सला जाण्याची संधी.
- कृषी विद्यापीठाने शोधल्या आहेत भाताच्या ३५ जाती.
- आता होणार आणखी संशोधन.

Web Title: New step of Konkan Agricultural University in rice research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.