Lokmat Agro >स्मार्ट शेती > Nimboli Ark : पाच टक्क्याचा निंबोळी अर्क घरच्या घरी कसा बनवाल वाचा सविस्तर

Nimboli Ark : पाच टक्क्याचा निंबोळी अर्क घरच्या घरी कसा बनवाल वाचा सविस्तर

Nimboli Ark : How to make five percent nimboli ark at home, read in detail | Nimboli Ark : पाच टक्क्याचा निंबोळी अर्क घरच्या घरी कसा बनवाल वाचा सविस्तर

Nimboli Ark : पाच टक्क्याचा निंबोळी अर्क घरच्या घरी कसा बनवाल वाचा सविस्तर

निंबोळीत असणारा 'अॅझाडिराक्टीन' हा घटक किटक, सुत्रकृमी विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाऱ्या किडींवर परिणाम करते.

निंबोळीत असणारा 'अॅझाडिराक्टीन' हा घटक किटक, सुत्रकृमी विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाऱ्या किडींवर परिणाम करते.

शेअर :

Join us
Join usNext

निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मोहोर येतो आणि मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्व होऊन त्यांचा सडा झाडाखाली पडतो.

या निंबोळ्या गोळा करून त्यातील दगड-धोंडे आणि खडे वेगळे करून पोत्यामध्ये वर्षभर साठविता येतात. साठविलेल्या निंबोळीपासून वर्षभरात गरजेप्रमाणे निंबोळीचा अर्क तयार करण्यासाठी, तसेच निंबोळी पेंड तयार करण्यासाठी वापर करता येतो.

कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'अॅझाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, तर ते पानांमध्ये कमी प्रमाणात असते. शेतीमध्ये निंबोळी ला खुप महत्व आहे. निंबोळी चा किटकनाशक बणविण्यासाठी उपयोग होतो.

निंबोळीत असणारा अझाडीरेक्टीन हा घटक किटक, सुत्रकृमी विषाणु आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग होतो. फक्त चाऊन खाणारे व रस शोषणाऱ्या किडींवर परिणाम करते.

निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे
१) संपूर्णपणे नैसर्गिक स्रोतांपासुन तयार होत असल्यामुळे खर्च अतिशय कमी येतो.
२) निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सर्व प्रकारच्या पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने नियमीत फ़वारणी घेतल्यास, रस शोषक किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते.
३) किडींच्या जीवनचक्रामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडी घालण्यापासुन परावृत्त केले जाते तसेच रसशोषक किडींचेदेखील अंडी घालण्याच्या नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा येतो.
४) नैसर्गिक घटक असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचे रासायनिक अंश राहत नाही. यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापर करण्यास सुलभ आहे. निर्यातीसाठीच्या भाजीपाला पिकामध्येदेखील याची फवारणी फायदेशीर ठरते.
५) कीटकनाशकांसोबतदेखील वापरता येत असल्या कारणाने तसेच एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीमध्ये वापरण्यास अगदी सोपे असे हे नैसर्गिक कीडनाशक आहे.
६) पांढरी माशी, मावा, फुलकिडे, विविध प्रकारच्या अळ्यांचे देखील नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. मोठ्या अळ्यांचे नियंत्रणात निंबोळी अर्काची जास्त मदत होत नाही यासाठी अळी लहान अवस्थेत असतानाच निंबोळी अर्काची फवारणी करावी.
७)  निंबोळी अर्क कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात.

हे महत्वाचे
१) मे ते जुन महिन्यात झाडावरून पिकलेल्या निंबोळ्या गोळा करा आणि सावलीत वाळवा.
२) आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोळ्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही.
३) नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
४) योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा.

५% निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत
एक एकरची फवारणी करीता लागणारे साहित्य:
५ किलो वाळलेल्या निंबोळ्या, १०० लीटर पाणी, २०० ग्रॅम कपडे धुण्याची पावडर, वस्त्रगाळ करण्यासाठी कापड, १०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी इ.
असा करा अर्क
- पिकलेल्या निंबोळ्या खाली पडल्यानंतर गोळा करून सावलीत वाळवून साठवणूक करा फवारणीच्या एक दिवस आगोदर ५ किलो पूर्ण वाळलेल्या निंबोळ्याची भुकटी (पावडर) तयार करा.
- ९ लिटर प्लास्टिकच्या बादलीत पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. निंबोळी भिजविताना बादली व्यवस्थित झाकून ठेवावी. त्याचबरोबर निंबोळी पावडर भिजविण्यासाठी थंड पाणी वापरावे.
- दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात भिजत ठेवलेली भुकटी वस्त्रगाळ करून द्रावण गाळून घ्या.
- नंतर १ लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम वॉशिंग पावडर (धुण्याचा सोडा) किंवा साबणाचा चुरा मिक्स करून घ्या. यामुळे द्रावण पिकाच्या पानावर चिटकून राहण्यास मदत होते.
- हे वॉशिंग पावडरचे द्रावण वस्त्रगाळ केलेल्या ९ लिटर द्रावणात मिसळून (ढवळून) एकत्र करून घ्या.
- हे दहा लिटरचे द्रावण तयार होईल. एका टाकीमध्ये ९० लिटर पाणी घ्या व वरील १० लिटरचे द्रावण त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ढवळा.
- अशा प्रकारे ५% निंबोळी अर्क तयार झाला आहे.

अधिक वाचा: बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज

Web Title: Nimboli Ark : How to make five percent nimboli ark at home, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.