Join us

ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 2:10 PM

निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते.

ती किंवा निगा न करता निसर्गतः उगवलेल्या भाज्या 'रानभाज्या म्हणून ओळखल्या जातात. मृग नक्षत्राचा पाऊस पडला की, रानभाज्या आपोआप उगवतात. त्यासाठी खास पेरणी करण्याची आवश्यकता भासत नाही. रानभाज्या मुख्यत्वे रानात, शेताच्या बांधावर, माळरानात येतात.

निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते.

जंगलालगत राहणारा आदिवासी समाज आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचा वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून, त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे ज्ञान नव्या पिढीतही कायम आहे.

या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक बनल्या आहेत. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवीच्या भाज्या असून, भाज्या सेवन करण्याबरोबर विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवरील जखमांवरही केला जातो. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या म्हणून ओळखल्या जातात. 

रानभाज्या वर्षातील काहीच महिने मिळतात, त्यामुळे जोपर्यंत मिळतात तोपर्यंत पुरेशा प्रमाणात खाऊन घ्याव्यात. रानभाज्यांमध्येही विविध प्रकार असून, भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून ते उकळून, भाजून, वरण, भाजी, वडी, भजी/पकोडा यांसारखे खाद्यपदार्थ तयार करून सेवन केले जाते.

रानभाज्यांमधील १४ भाज्या तर मधुमेह, पोटदुखी, खोकला यावर औषधी ठरल्या आहेत. काही भाज्या गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो.

त्यामुळे पालेभाज्या खाणाऱ्यांचा मोर्चा रानभाज्यांकडे वळतो. कारण या भाज्या फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होतात, भारंगी, टाकळा, करटोळी, पानांचा ओवा, आघाडा, अळंबी, फोडशी, अळू, कुडा, कोवळा बांबू, काटेमाठ, मुळवेल, कवळी, शेवळा, मायाळू, भोकर, गोखरू, शेवगा, रानकेळी, शतावरी, करवंद, रताळी, महाळुंगे, कुई या रानभाज्या उपलब्ध होत असून, हंगामी भाज्यांचे सेवन प्राधान्याने व आवडीने केले जाते.

कोणत्याही लागवडीशिवाय, खते, कीटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या या रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित आहेत. अगदी फुकट व मुबलक मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून गावातील लोक खात असले तरी शहरात या भाज्यांची विक्री करून उदरनिर्वाह करणारी मंडळीही आहेत.

सर्व रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे भाज्यांचा खपही चांगला होतो. ग्रामीण भागातील गुराखी महिला/पुरुष दिवसभर रानावनात फिरून भाज्या जमवून आणतात, सायंकाळी घरी आल्यावर त्याच्या जुड्धा बांधल्या जातात, तर सकाळच्या सत्रात रानभाज्या विक्रीसाठी महिला विक्रेत्या शहरात येतात.

सध्या ग्रामीण भागात भात लागवडीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने विक्रेत्या महिलांचे प्रमाण कमी आहे. शिवाय भाज्याही मोजक्याच उपलब्ध होत आहेत; परंतु श्रवणापासून भाज्यांची संख्या वाढेल असे सांगण्यात येत आहे. शहरवासीयांनाही रानभाज्यांची भुरळ असल्यामुळे भाज्यांचा खप चांगला होतो, शिवाय ग्रामीण भागातील विक्रेत्यांचा रानभाज्या विक्रीतून उदरनिर्वाह होतो.

फोडशीही कांटावर्गीय भाजी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी उगवते. किंचित पातळ व बारीक पात, लहान व पांढरा शुभ्र कांदा असलेली भाजी फोडशी म्हणून ओळखली जाते. उगवल्यापासून पंधरवडाभर ही भाजी खाण्यासाठी योग्य व चविष्ट असते. पाती जुर्ती झाल्यावर भाजी चचीला चांगली लागत नाही. या भाजीमध्ये कर्बोदके, खनिजे, प्रथिनांचा स्रोत आहे आणि एनोरेक्सिया, डाँकायटिसमध्ये उपयुक्त आहे. युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथीमध्ये ही औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते.

भारंगीचे गारुडभारंगीचे मूळ ज्चर किवा कफ असलेल्या आजारात देतात. कक जास्त पाडल्याने होणारा दमा, खोकला या विकारात भारंगीचे मूळ प्रामुख्याने वापरात, सर्दी व घशातील दोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात. दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा, अडूळसाची पाने यांचा काढा करून देतात. भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते.

करटोलीकरटोली भाजीला रानकारली असेही मानतात. करटोली कोवळी असली तर त्यात बिया नसतात. बिया असल्या तर त्या काढाव्या लागतात. लोखंडी तव्यावर शिजवलेली करटोलीची भाजी चविष्ट लागते. कारल्याप्रमाणे करटोली कडवट नसतात. ही भाजी मूत्रविकारांवर अतिशय गुणकारी आहे. डोकेदु‌खीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन व नारळाचा रस एकत्र करून चोळतात. मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात.

औषधी उपयोगाचा टाकळाही वनस्पती पावसाळ्यातच उगवते. हि भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेला कुठेही वाढते. सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्याने विशेष उपयोग होतो. याशिवाय इसब, अॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्यचा विकार कमी होतात. टाकळ्याच्या पानाची भाजी सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात. दात येणाऱ्या लहान मुलांना ताप येतो. अशावेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यांना दिल्याने तापावर नियंत्रण येते.

बांबूचे कोंबपावसाळ्याच्या सुरुवातीस बांबूच्या बेटात नवे कोंब उगवतात. फूटभर उंचीचे कोवळे कोंब भाजीसाही उपयुक्त असतात. आम्लपित्ताच्या अनेक विकारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. वर्षातून एकदातरी बांबूच्या कोंबाची भाजी अवश्य खावी.

टॅग्स :भाज्यापाऊसशेतीआरोग्यघरगुती उपायजंगलइनडोअर प्लाण्ट्स