Join us

Paddy Nursery भाताच्या सशक्त रोपांसाठी कशी तयार कराल रोपवाटीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:05 AM

भात हे भारतातली मुख्य अन्न धान्य पीक असून महाराष्ट्रात हे खरीप हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. भात लागवड करण्या पूर्वी भाताची रोपे तयार करून घेणे गरजेचे आहे.

भात हे भारतातली मुख्य अन्न धान्य पीक असून महाराष्ट्रात हे खरीप हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. भात लागवड करण्या पूर्वी भाताची रोपे तयार करून घेणे गरजेचे आहे. त्या साठी भात रोपवाटीका व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. 

रोपवाटीका व्यवस्थापन

  • ज्या जागेवर रोपवाटीका करणार आहोत ती जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावीत.
  • हेक्टरी १० टन या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
  • जमिनीचा उतार लक्षात घेऊन घेऊन, निचरा होणाऱ्या जागी ८-१० सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावे.
  • या तयार केलेल्या वाफ्यावर प्रती गुंठा १ किलो युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, द्यावे.
  • बियाणे पेरणी पूर्वी २.५ ग्राम थायरम हे बुरशी नाशक चोळून घाव्ये.
  • बनवलेल्या वाफ्यावर आडव्या १० सेंटिमीटर ओळीमध्ये साधारणतः २.५-३ सेंटिमीटर खोलीवर बी पेरून मातीने झाकून घ्यावे.
  • भाताच्या जाती नुसार हेक्टरी बियाणाचे प्रमाण घ्यावे.
  • पेरणी केल्या नंतर साधारण पंधरा दिवसांनी प्रती गुंठा १ किलो युरिया हा दुसरी नत्राची मात्रा द्यावी.
  • या कालावधी मध्ये तणांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, त्यासाठी पेरणी नंतर वाफे ओले असताना ऑक्सडायारजील (80 WP) प्रती पाच लिटर पाण्यात १.२५ ग्रॅम या प्रमाणात फवारून घ्यावे.
  • तसेच उपलब्धतेनुसार भात रोपवाटीकेच्या रांगेमध्ये मोकळ्या जागेत प्रती हेक्टरी एक टन गिरिपुष्पच पाला पसरावा. 
  • पावसाचा ताण पडला तर वरून एखादे पाणी द्यावे जेणेकरुन रोपांची वाढ जोरात होईल.

अशा प्रकारे भात रोपवाटीका व्यवस्थापन करून चांगल्या प्रतीची रोपे तयार करू शकतो. जेणकरून मुख्य पिकाचे उत्पन्न चांगले येईल.

डॉ. व्ही. जी. मोरे (सहयोगी प्राध्यापक)डॉ. व्ही. ए. राजेमहाडिक (सहाय्यक प्राध्यापक)प्रविण सरवळे (पी एच. डी. विध्यार्थी)डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

अधिक वाचा: Seed Germination Test बियाणांची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचा वापर का करतात?

टॅग्स :भातशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनकोकणदापोली