Lokmat Agro >स्मार्ट शेती > Paddy Variety शेतकऱ्यांनो सुधारित वाणांचे हे आहेत फायदे, कसे निवडाल भात पिकांचे वाण

Paddy Variety शेतकऱ्यांनो सुधारित वाणांचे हे आहेत फायदे, कसे निवडाल भात पिकांचे वाण

Paddy Variety; Farmers Here are the Benefits of Improved Varieties How to Choose Paddy Crop Varieties | Paddy Variety शेतकऱ्यांनो सुधारित वाणांचे हे आहेत फायदे, कसे निवडाल भात पिकांचे वाण

Paddy Variety शेतकऱ्यांनो सुधारित वाणांचे हे आहेत फायदे, कसे निवडाल भात पिकांचे वाण

शेतकऱ्यांनी सुधारित जातींचे प्रमाणित बियाणे वापरले पाहिजे. सुधारित वाणांमध्ये आढळणारी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.

शेतकऱ्यांनी सुधारित जातींचे प्रमाणित बियाणे वापरले पाहिजे. सुधारित वाणांमध्ये आढळणारी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांनी सुधारित जातींचे प्रमाणित बियाणे वापरले पाहिजे. सुधारित वाणांमध्ये आढळणारी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.

पाने जाड, रुंद व उभट आणि गर्द हिरव्या रंगाची असल्यामुळे कर्ब ग्रहणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होते तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीर्घकाळपर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात; त्यामुळे पानातील लोंबीत पळींजाचे प्रमाण कमी राहते.

चुडांना प्रमाणात फुटवे येतात आणि त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात. यामुळे भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) अधिक मिळते.

अ) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
हळवा गट : फुले राधा
निमगरवा सुवासिक गट : इंद्रायणी, फुले समृध्दी व भोगावती

ब) डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली
हळवा गट : कर्जत २४, कर्जत ३, कर्जत ७ व रत्नागिरी - ५
निमगरवा गट : कर्जत-५, कर्जत-६, बी.ए.आर.सी. के. के.वि. - १८४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी १३ व पालघर १, रत्नागिरी ७ व रत्नागिरी-८
गरवा गट : रत्नागिरी-२, रत्नागिरी ३, कर्जत २, कर्जत-८ व कर्जत-१०
संकरित गट : सह्याद्री २, सह्याद्री ३. सह्याद्री ४ व सह्याद्री-५
खार जमिनीसाठी : पनवेल १, पनवेल २ व पनवेल- ३

क) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
हळवा गट : साकोली ६ व सिदेवाही-१
निमगरवा गट : सिंदेवाही ४, सिंदेवाही ५ पी के वि. एच एम टी, पी डी के वि. अक्षद, सिंदेवाही-२००१ साकोली ७ व पी के. व. गणेश, पी डी के वि. किसान, साकोली ९, पी डी के वि. साकोली रेड राईस-१
निमगरवा सुवासिक गट : पी के. वि. मकरंद, पी के वि. खमंग
गरवा गट : साकोली ८, पी डी के वि. मकरंद

ड) डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
प्रभावती, पराग, अंबिका व तेरणा

अधिक वाचा: Paddy Nursery भाताच्या सशक्त रोपांसाठी कशी तयार कराल रोपवाटीका

Web Title: Paddy Variety; Farmers Here are the Benefits of Improved Varieties How to Choose Paddy Crop Varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.