Lokmat Agro >स्मार्ट शेती > Papai Pik Vima Yojana 2024 : पपई फळपिकासाठी कशी मिळते नुकसान भरपाई? किती भराल विमा वाचा सविस्तर

Papai Pik Vima Yojana 2024 : पपई फळपिकासाठी कशी मिळते नुकसान भरपाई? किती भराल विमा वाचा सविस्तर

Papai Pik Vima Yojana 2024 : How to get compensation for papaya crop? How much will you pay for insurance read in detail | Papai Pik Vima Yojana 2024 : पपई फळपिकासाठी कशी मिळते नुकसान भरपाई? किती भराल विमा वाचा सविस्तर

Papai Pik Vima Yojana 2024 : पपई फळपिकासाठी कशी मिळते नुकसान भरपाई? किती भराल विमा वाचा सविस्तर

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.

मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (‍रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. 

मोसंबी पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

 संरक्षित रक्कम रु.शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.
नियमित विमा४०,०००/-२,०००/-
गारपीट१३,०००/-६५०/-

हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)

१) कमी तापमान (दि. ०१ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी)
या कालावधीमध्ये सलग ३ दिवस तापमान ८ डि.से. किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १२,०००/- देय राहील.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु.१२,०००/-)

२) वेगाचा वारा (दि. ०१ फेब्रुवारी ते ३० जून)
(दि. २२/०१/२०१६ च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा भरपाई देय होईल.)
या कालावधीमध्ये ४० कि.मी. प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासुन ७२ तासात नुकसानग्रस्त पपई पिकाची माहिती कृषि विभाग/विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. 
संबधित विमा कंपनी, महसूल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चि त करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्‍याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. १२,०००/-)

३) जास्त पाऊस व आर्द्रता (दि. १५ जून ते ३० सप्टेंबर)
प्रतिदिन ४० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास व आर्द्रता सलग ५ दिवस ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहील्यास नुकसान भरपाई रक्कम रु. १६,०००/- देय राहील.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. १६,०००/-)

गारपीटसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२४

संपर्क
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in 
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करावी व कसे करावे नियोजन

Web Title: Papai Pik Vima Yojana 2024 : How to get compensation for papaya crop? How much will you pay for insurance read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.