Join us

परभणी कृषी विद्यापीठाकडून मर रोगास प्रतिबंधक हरभऱ्याचे नवीन वाण विकसित वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:27 AM

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला.

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला.

याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (अ) हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना - १६ (बीडीएनजी २०१८-१६) या वाणाचा समावेश आहे.

देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले.

देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे मुख्‍य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्‍याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग यांनी दिली. 

परभणी चना - १६ (बीडीएनजी २०१८-१६) वाणाची वैशिष्ट्ये१) हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केला आहे.२) हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.३) या वाणापासून सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो.४) मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत.५) १०० दाण्याचे वजन २९ ग्रॅम भरते.६)  या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो.

अधिक वाचा: मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून देशी व अमेरिकन कापसाचे दोन वाण प्रसारित वाचा सविस्तर

टॅग्स :हरभरापीककेंद्र सरकारवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपीक व्यवस्थापनविद्यापीठमहाराष्ट्र