वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो आणि मिरची पिकांच्या वाणांस महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
१) मिरची (पीबीएनसी १७)
- हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर
- मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस.
- हा वाण लिफकर्ल व अॅथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.
२) टोमॅटो (पिबीएनटी २०)
- हा वाण रबी हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस आहे.
- या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
- या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजण ६० ते ६५ ग्रॅम आहे.
- लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहीली काढणीस येते.
- हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुलकिडे या किडींस मध्यम सहनशील आहे.
या वाणांच्या विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचे महत्वपूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल शास्त्रज्ञानी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मिरची आणि टोमॅटोच्या वाण विकासामध्ये डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. आर. डी. बगीले, डॉ. आनंद दौंडे, डॉ. जी. एम वाघमारे, डॉ. व्ही. एस. जगताप, डॉ. एस. व्ही. धुतराज या शास्त्रज्ञांचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
अधिक वाचा: एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर