Join us

Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 2:25 PM

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ जुलैपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने २०१६ पासून प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजना सुरू केली. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर दोन्ही हंगामांतील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के रकमी शेतकऱ्यांकडून घेतली जात होती.

मात्र, आता राज्य शासन हे पैसे भरणार असून, शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.

'या' पिकांसाठी विमा संरक्षणतृणधान्य, कडधान्य : भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका.गळीत धान्य : भुईमुग, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ.नगदी पीक : कापूस, कांदा.

मागील हंगामात ५५ हजार शेतकरी सहभागीप्रधानमंत्री पीक विमा योजनेचे निकष, भरावा लागणारा हप्ता आणि मिळणारी भरपाई पाहून यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी होता मात्र, गेल्या वर्षीपासून एक रुपयात विमा योजना लागू केल्याने जिल्ह्यातील ५५ हजार ४६७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातील ७०९ शेतकऱ्यांना ३५ लाख ६८ हजार रुपये भरपाई मिळाली.

योजनेचा ऑनलाइन अर्ज असा करा.■ सुरुवातीला pmfby.gov.in असं सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.■ येथील Farmer Application या पर्यायावर क्लिक करा.■ त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करा.■ नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करून सर्व माहिती भरा.

मोबाइल क्रमांक टाकून verify वर क्लिक करा.■ स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल, तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.■ सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करा.■ डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि ८-अ उतारा, एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन अपलोड करा.

अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

टॅग्स :पीक विमापीकशेतकरीखरीपरब्बीशेतीकेंद्र सरकारराज्य सरकार