Join us

ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 4:22 PM

शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी.

शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारीहरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी.

रब्बी ज्वारी

  • रब्बी हंगामामध्ये ज्वारीची पेरणी १५ ऑक्टोबर पर्यंत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोलीपर्यंत करावी.
  • पेरणी ४५ X १५ सें.मी. अंतरावर करावी.
  • पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. कल्चर चोळावे.
  • मध्यम जमिनीसाठी नत्रः स्फुरदः पालाश ४०:२०:०० किलो प्रती हेक्टरी याप्रमाणात द्यावे.
  • वरील खतापैकी नत्र खताचा पहिला हप्ता (१/२ नत्र) संपूर्ण स्फुरद हे पेरणीच्यावेळी द्यावे.
  • कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित/संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावेत.

हरभरा

  • जिरायती हरभरा पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते यांची उपलब्धता करून घ्यावी तसेच जिरायत हरभरा पेरणी २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या दरम्यान जमिनीमध्ये वाफसा असताना करावी.
  • पेरणीकरता फुले विक्रम, फुले विश्वराज, विजय इ. वाणांची निवड करावी.
  • बिजप्रक्रीया करणे अत्यंत महत्त्वाचे असुन खरीप हंगामातील सोयाबीन पीक निघाल्यानंतर मुळकुज व मानकुज या रोगापासून संरक्षण होण्यासाठी ट्रायकोडर्मा हरजियानम १.०% डब्ल्यू. पी. ६ ग्रॅम प्रति किलो बीजप्रकियेसाठी तसेच आळवणीसाठी लागवडीनंतर ५० दिवसांनी वापरावी.
  • यानंतर प्रत्येकी २५० ग्रॅम रायझोबियम व पी.एस.बी. प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.
  • हरभऱ्यावरील घाटे आळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी हरभरा पेरताना मिसळून पेरावी.
टॅग्स :रब्बीशेतकरीशेतीपीकज्वारीहरभरापेरणीलागवड, मशागत