महाराष्ट्रामध्ये सन २०२२-२३ या वर्षात १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. त्यापासुन हेक्टरी सरासरी ९१.२४ टन ऊसाचे उत्पादन मिळाले.
सदर वर्ष महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत आणि शेतकरी यांना फायदेशीर ठरले असून उत्पादन वाढीत पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या तंत्राचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे.
लागवडीचे हंगाम
आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते.
ऊस बेणे निवड कशी करावी?
- बेणे मळ्यात वाढविलेले ०९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवांशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
- दर ३ वर्षांनी नव्याने बेणेमळ्यातील बेणे वापरावे.
- ऊस बेणेमळा करणेसाठी २० डोळे असलेल्या १० उसांचा वापर केल्यास नंतरच्या वर्षात १००० उसापासून दोन डोळ्याची २०००० टिपरी वापरून दोन एकरावर उसाची लागवड करता येते.
ऊस लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी ऊसाची रोपे टिपरी
दोन सरीतील अंतर | रोपांमध्ये २.० फूट अंतर | रोपांमध्ये १.५ फूट अंतर |
१२० सेंमी. (४ फूट) | ५,५५५ | ७,४०७ |
१३५ सेंमी. (४.५ फूट) | ४,९३८ | ६,५८४ |
१५० सेंमी. (५ फूट) | ४,४४४ | ५,९२५ |
१८० सेंमी. (६ फूट) | ३,७०४ | ४,९३८ |
जोड ओळ २.५ फूट | ५,९२६ | ७,९०१ |
जोड ओळ ३ फूट | ४,९३८ | ६,५८४ |
ऊस लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी ऊसाची टिपरी
दोन सरीतील अंतर | १ फुटावर एक डोळा टिपरी | अर्धा फुटावर दोन डोळा टिपरी |
१२० सेंमी. (४ फूट) | ११,१११ | ११,१११ |
१२० सेंमी. (४ फूट) | ९,८७६ | ९,८७६ |
१५० सेंमी. (५ फूट) | ८,८८८ | ८,८८८ |
१८० सेंमी. (६ फूट) | ७,४०७ | ७,४०७ |
जोड ओळ २.५ फूट | ११,८५१ | ११,८५१ |
जोड ओळ ३ फूट | ९,८७६ | ९,८७६ |