Join us

ऊस लागवड करताय? एकरी किती रोपे किंवा टिपरी लागतील वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 3:46 PM

आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते.

महाराष्ट्रामध्ये सन २०२२-२३ या वर्षात १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. त्यापासुन हेक्टरी सरासरी ९१.२४ टन ऊसाचे उत्पादन मिळाले.

सदर वर्ष महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत आणि शेतकरी यांना फायदेशीर ठरले असून उत्पादन वाढीत पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या तंत्राचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आणि पोषक आहे.

लागवडीचे हंगामआडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते.

ऊस बेणे निवड कशी करावी?- बेणे मळ्यात वाढविलेले ०९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवांशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.- दर ३ वर्षांनी नव्याने बेणेमळ्यातील बेणे वापरावे.- ऊस बेणेमळा करणेसाठी २० डोळे असलेल्या १० उसांचा वापर केल्यास नंतरच्या वर्षात १००० उसापासून दोन डोळ्याची २०००० टिपरी वापरून दोन एकरावर उसाची लागवड करता येते.

ऊस लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी ऊसाची रोपे टिपरी

दोन सरीतील अंतररोपांमध्ये २.० फूट अंतररोपांमध्ये १.५ फूट अंतर
१२० सेंमी. (४ फूट)५,५५५७,४०७
१३५ सेंमी. (४.५ फूट)४,९३८६,५८४
१५० सेंमी. (५ फूट)४,४४४५,९२५
१८० सेंमी. (६ फूट)३,७०४४,९३८
जोड ओळ २.५ फूट५,९२६७,९०१
जोड ओळ ३ फूट४,९३८६,५८४

ऊस लागवडीसाठी अंतर आणि एकरी लागणारी ऊसाची टिपरी

दोन सरीतील अंतर१ फुटावर एक डोळा टिपरीअर्धा फुटावर दोन डोळा टिपरी
१२० सेंमी. (४ फूट)११,१११११,१११
१२० सेंमी. (४ फूट)९,८७६९,८७६
१५० सेंमी. (५ फूट)८,८८८८,८८८
१८० सेंमी. (६ फूट)७,४०७७,४०७
जोड ओळ २.५ फूट११,८५१११,८५१
जोड ओळ ३ फूट९,८७६९,८७६
टॅग्स :ऊसशेतीपीकलागवड, मशागतपीक व्यवस्थापनसाखर कारखाने