पीएम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली.
या योजनेतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्याच्या आधार सलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष रुपये ६,०००/- हस्तातरित केले जातात.
काही लाभार्थींना बरेच दिवस झाले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) चे हप्ते मिळणे बंद झाले आहेत. हे हप्ते बंद होण्याची कारणे काय त्यावर उपाय काय ते पाहूया.
अ.क्र | कारणे | उपाय काय करावे? |
१ | जमिनीचे प्रमाणिकरण नसणे (Land Seeding) | महसुल विभागाशी संपर्क करून जमिनीचे (Land Seeding) करून येणे. |
२ | ईकेवायसी (eKYC) केलेली नसणे. | स्वतः, सीएससी किंवा गावातील कृषी सहायक यांच्या मार्फत ईकेवायसी करून घेणे. |
३ | बँक खाते आधार लिंक नसणे. | बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजिकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे. |
४ | बँक खाते DBT Enable नसणे. | बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजिकच्या पोस्टात DBT Enable खाते उघडणे. |
५ | आधार लिंक बँक खाते बंद असणे. | बँक खाते सुरू करून घेणे. |
६ | बँक खात्यास दुसऱ्या कुणाचे आधार लिंक असणे. | बँकेत जाऊन दुरूस्ती करून घेणे. |
७ | नोंदणीनंतर आधार मध्ये दुरूस्ती करणे. | स्वतः किंवा सीएससी मार्फत पोर्टलवर आधार दुरूस्ती करून घेणे. |
८ | नोंदणी केल्यानंतरच्या काळात आयकर भरणा करणे. | अर्ज अपात्र होतो. |
९ | स्वतः योजनाचा लाभ समर्पित करणे. | योजनेत परत लाभ घेता येणार नाही. |
१० | विविध कारणास्तव अर्ज अपात्र (Inactive) असणे. | आपण पात्र असुनही अपात्र घोषित केले असेल तर सर्व अधिकृत पुराव्यासह (कागदपत्रे) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपत्रता मागे घेण्याबाबत अर्ज करणे. |
११ | लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे. | अर्ज अपात्र होतो. |
१२ | नोंदणी नंतर जमिनीची विक्री केल्याने भुमिहिन होणे. | योजनेत परत लाभ घेता येणार नाही. |
१३ | बँकेकडून व्यवहार (Transaction Failure) नाकारणे. | बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी दूर करणे. |
संपर्क:
अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक (Village Nodal Officer), कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तथा तालुका नोडल अधिकारी पीएम किसान यांच्याशी संपर्क करावा.
अधिक वाचा: Jamin Mojani : जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता आला हा नवीन निर्णय; वाचा सविस्तर