Lokmat Agro >स्मार्ट शेती > PM Kisan: काय सांगता, पीएम किसानचे पैसे जमा झाले नाहीत? अशी करा तक्रार

PM Kisan: काय सांगता, पीएम किसानचे पैसे जमा झाले नाहीत? अशी करा तक्रार

PM Kisan: how to complain if Pm kisan Yojna's 17th instalment not deposited yet | PM Kisan: काय सांगता, पीएम किसानचे पैसे जमा झाले नाहीत? अशी करा तक्रार

PM Kisan: काय सांगता, पीएम किसानचे पैसे जमा झाले नाहीत? अशी करा तक्रार

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता तुमच्या खात्यातवर जमा झाला नाही का? मग जाणून घ्या पुढे काय करायचे ते.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता तुमच्या खात्यातवर जमा झाला नाही का? मग जाणून घ्या पुढे काय करायचे ते.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kisan Yojana 17th Instalment पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता काल दिनांक १८ जून रोजी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. एकूण ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २० हजार कोटी रुपये जमा झालेत.

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत, त्यांना त्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून मिळते. मात्र काल असेही अनेक शेतकरी होते की त्यांच्या खात्यात् पैसेच जमा झालेले नव्हते. अनेकांनी कागदपत्रे आणि केवायसी केल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तुम्हीही त्यापैकी एक असाल, तर जाणून घेऊ या बद्दल तक्रार कशी करायची? ते.

ऑनलाईन माध्यमातून तक्रार
पीएम किसानचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्ही तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतात. त्यासाठी  pmkisan-ict@gov.in वर मेल करता येईल.

फोनद्वारे करा तक्रार
याशिवाय शेतकरी हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर तुम्हाला फोन करून संपर्क करता येईल. तसेच ०११-२३३८१०९२ या क्रमांकावरही तुम्ही संपर्क करू शकता.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसे तपासावे? 
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in भेट द्या.
मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती या टॅबवर क्लिक करा
यामध्ये आधार क्रमांक, खाते क्रमांक व मोबाइल नंबर टाकावा लागेल.
निवडलेल्या पर्यायावर डेटा मिळवा या टॅबवर क्लिक करा
लाभार्थी डेटा पाहण्यास पात्र ठरतील.

Web Title: PM Kisan: how to complain if Pm kisan Yojna's 17th instalment not deposited yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.