पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, आता पीएम किसानसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे.
केंद्र शासनाने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. आता राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे.
वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला अथवा अठरा वर्षावरील मुलांना याचा लाभ घेता येतो.
उताऱ्यावर २०१९ पूर्वी नोंद असेल अथवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा तसेच २०१९ नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरवाशिणीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हीकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आहे.
पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
■ लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा.
■ शेतकऱ्याचा आठ अ उतारा.
■ लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड.
■ लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार.
■ विहित नमुना अर्ज.
■ शिधापत्रिका.
अधिक वाचा: Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट