Join us

सिंचनासाठी अल्प- अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळते ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या सर्व माहिती

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 20, 2024 11:45 AM

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रती थेंब अधिक पीक

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी सुक्ष्म सिंचन यंत्रणा (Pradhanmantri Krushi sinchan yojna) बसवण्यासाठी सरकारकडून अल्प व अत्यल्प भूधारकांना ५५ टक्के अनुदान देण्यात येते. तसेच इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळावे या उद्देशाने पंधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु झाली आहे.

केंद्र व राज्याची एकत्रित योजना असून केंद्राकडून ६० टक्के तर राज्याकडून ४० टक्के असे या योजनेत अर्थसहाय्य केले जाते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात असून खरीप पेरण्यांच्या सुरुवातीला शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात. जाणून घ्या या योजनेची पात्रता, कागदपत्र, आणि इतर सर्व माहिती..

पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ

सुक्ष्म सिंचन यंत्रणा बसविण्यासाठी प्रती लाभार्थी ५ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देय राहील. सूक्ष्म सिंचन योजनेचा ज्याने ५ हेक्टरच्या मर्यादेत लाभ घेतला आहे, अशा लाभधारकास सात वर्षांनंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

  1. शेतक-याच्या नावे मालकी हक्काचा 8 अ आणि 7/12 असावा.

  2. सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद 7/12 उता-यावर असावी. नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र द्यावे. इतर साधनांद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधीत विभागाच्या अधिका-याचे प्रमाणपत्र शेतक-यांनी सादर करावे.

  3. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधीतांचे करारपत्र द्यावे.
  4. विद्युतपंपाकरीता कायम स्वरुपी विद्युत जोडणी असावी. त्यापृष्ठ्यर्थ मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत सादर करावी.

  5. सोलरपंपाची व्यवस्था असल्यास सोलार पंप बसवुन घेतल्याबाबतचे पत्र व सोलार पंपाबाबतची कागदपत्रे शेतक-यांनी प्रस्तावाबाबत द्यावे.

शेतक-यांकडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.कोणती कागदपत्रे लागतात?

    1. पुर्वसंमती पत्र
    2. 7/12 उतारा (मालकी हक्कासाठी)
    3. 8-अ उतारा ( एकुण क्षेत्राच्या माहितीसाठी)
    4. आधारकार्ड सत्यप्रत
    5. आधारलिंक्ड राष्ट्रीयकृत बॅंक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत

कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र  

कोणती कागदपत्रे आवश्यक

  1. शेतक-याने केलेल्या आॅनलाईन अर्जाची प्रत

    1.    ज्या ठिकाणी शेतजमीन आहे आणि त्याकरीता अर्ज करावायाचा आहे तो जिल्हा,तालुका, गाव

    2.     लाभ घेणेकरीता लागवड क्षेत्र, खाते उतारा क्रमांक,पीक,पिकातील अंतर,

    3.    बॅंक खाते क्र, शाखा, जिल्हा, बॅंकेचे नांव (राष्ट्रीयकृत बॅंक फक्त)

    4.    ज्या उत्पादक कंपनीकडुन संच खरेदी करणार आहे ती कंपनी

    5.    “ पुर्वसंमती शिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे” असे स्वयंघोषणापत्र वर बरोबर ची मार्क करुन अर्ज सादर करणे.

    6.    शासन निर्देशानुसार अंतिमत: अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.

    7.    अर्ज सादर केलेनंतर मोबाईलवर संदेशाद्वारे अर्ज क्र. प्राप्त होतो. ज्याद्वारे अर्ज स्थिती पाहण्यास मदत होते.

    या योजनेला अर्ज करण्यासाठी कृषी विभागाने दिलेल्या या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकतात.

    http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php  या ई-ठिबक  वेबसाईटव

टॅग्स :सरकारी योजनापाटबंधारे प्रकल्पशेती