डाळिंब हे प्रामुख्याने अवर्षणप्रवण भागात शेतकऱ्यांना अति फायदेशीर ठरणारे फळपीक आहे. महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानामुळेडाळिंब झाडास वर्षातून केंव्हाही फुले येतात.
त्यामुळे मृग बहार (जून-जुलै), हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर), आंबे बहार (जानेवारी-फेब्रुवारी) यापैकी व्यापारीदृष्ट्या तसेच बाजारातील विविध फळांची उपलब्धता पाहून कोणताही बहार घेता येतो.
या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे.
रसशोषक किडी१) फुलकिडेया किडीचा आकार लहान असून लांबट निमुळते शरीर असते. या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्याकरिता झाडावरील नवीन पालवी व उमललेले फूल जर आपण तळहातावर झटकले तर फुलकिड्यांचे असंख्य किडे आपल्या हातावर पडतात आणि ते आपल्याला डोळ्याने सहजपणे दिसतात. फुलकिड्यांची पिल्ले आणि प्रौढ पानांवरील कोवळ्या फांद्यावरील आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषून घेतात. परिणामतः प्रादुर्भाव झालेली पाने वेडीवाकडी होतात. लहान फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग खरवडल्यामुळे शुष्क बनतो व फळांचा आकार जसा वाढत जातो तसा शुष्क भागाचा आकार वाढतो. यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होऊन अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही.
२) मावा ही कीड आकाराने लहान असून प्रजातीनुसार मावा किडीचा रंग हिरवा, पिवळा किंवा तपकिरी काळपट असतो. नवीन पालवी, कोवळ्या शेंड्यावर, फुलांवर व फळांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून यतो, पिल्ले व प्रौढ रस शोषून त्यावर उपजिविका करतात. यामुळे लहान कळ्या, फुले, फळे गळून पडतात. प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर शेंडे चिकट होऊन त्यावर तसेच पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते. थंडीच्या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
३) पिठ्या ढेकूणपिढ्या ढेकणाचा रंग पांढरा असून त्याचा आकार अंडाकृती असतो. पूर्ण वाढ झालेल्या कीडीच्या अंगावर कापसासारखे आवरण असते. पिल्लांचा रंग विटकरी असतो. पिल्ले व प्रौढ फळांवर, देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून रस शोषण करते. या किडीच्या शरीरातून चिकट द्रव स्त्रावत असल्याने फळे चिकट होऊन त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. फळे लहान असताना जर जास्त प्रादुर्भाव झाला तर अशी फळे गळून पडतात. मोठ्या फळांवर प्रादुर्भाव झाला तर अशी फळे चिकट काळपट झाल्याने बाजारात विकण्यायोग्य रहात नाहीत. कळी अवस्थेतसुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यावेळी कळ्या गळून पडतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
४) पांढरी माशीपांढऱ्या माशीचे वास्तव्य पानांच्या मागील बाजूस असते. पानाच्या मागील बाजूस समूहाने या किडीचे पिल्ले आणि प्रौढ माशा राखाडी-पांढऱ्या रंगाच्या दिसून येतात. या किडींची पिल्ले पानातील पेशीद्रव्य शोषतात. तर प्रौढ माशी कोवळ्या पानातील पेशी द्रव्यावर उपजिविका करतात. या किडीची मादी माशी अतिसूक्ष्म अंडी पानांवर घालतात आणि त्यापुढील संपूर्ण जीवनक्रम झाडांच्या पानांवरच पूर्ण होतो. पानांवर चिकट द्रव स्त्रावणाने त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पर्यायाने झाडाची वाढ स्थिरावते.
एकात्मिक व्यवस्थापन१) बाग स्वच्छ ठेवावी व तणांचा बंदोबस्त वेळीच करावा.२) झाडांच्या छाटणीचे नियोजन अशा पध्दतीने करावे की जेणेकरून झाडांवर फांद्याची गर्दी होणार नाही तसेच फवारणी करतेवेळी किटकनाशकाचे द्रावण झाडाच्या संपूर्ण भागात पोहोचण्यास मदत होईल.३) वर्षातून शक्यतो एकच बहार घ्यावा. इतर अवेळी येणारी फुले फळे तोडून नष्ट करावीत.४) मृग बहारात किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो म्हणून शक्यतो मृग बहार घेणे टाळावे.५) बागेच्या सभोवती बांधावरील किंवा नदीनाल्या किनाऱ्यावरील रस शोषणाऱ्या पतंगाच्या अळीला पुरक असणाऱ्या जंगली वनस्पतींचा नायनाट करावा. उदा. गुळवेल, वासनवेल.६) सायंकाळच्या वेळी बागेत धूर करावा.७) प्रकाश सापळ्याचा वापर करावा जेणेकरून आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.८) रस शोषक किडीवर उपजिवीका करणाऱ्या परोपजीवी किडींचे (क्रायसोपर्ला, ढालकीडा, क्रिप्टोलेमस, सिरफिड माशी इ.) संवर्धन करावे.१०) ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा १ टक्के नीम ऑईल (१०००० पीपीएम) फवारणी करावी.११) रस शोषक पतंगाना बागेपासून परावृत्त करण्याकरिता सिट्रोनेला ऑईलचा वापर करावा.१२) पिठ्या ढेकूण या किडीच्या नियंत्रणाकरिता व्हर्टिसिलीयम लेकॅनी ४ ग्रॅम/लिटर या प्रमाणात परोपजीवी बुरशीची फवारणी करावी.१३) पिठ्या किडीच्या नियंत्रणाकरिता किटकनाशकाच्या द्रावणात 'फिश ऑईल रेझीन' सोप प्रति लिटर २.५ ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.१४) किटकनाशकाची फवारणी शक्यतो आवश्यकता असेल तेव्हाच करावी. त्याकरीता खालील दिलेल्या किटकनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.