Join us

Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट

By रविंद्र जाधव | Updated: December 29, 2024 16:46 IST

Profitable Farming Formula : दिवसेंदिवस लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र घटत चालले आहे ज्यातून प्रति मनुष्य शेती धारणा कमी होत चालली आहे. यासोबतच उत्पादित होणाऱ्या शेतमालाला अपेक्षित दर नसल्याचे वारंवार शेती व्यवसाय धोक्याचा अशी समज निर्माण होत आहे.

दिवसेंदिवस लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र घटत चालले आहे ज्यातून प्रति मनुष्य शेती धारणा कमी होत चालली आहे. यासोबतच उत्पादित होणाऱ्या शेतमालाला अपेक्षित दर नसल्याचे वारंवार शेती व्यवसाय धोक्याचा अशी समज निर्माण होत आहे.

तसेच बदलत्या हवामानामुळे आणि शेतीत वाढलेल्या विविध संकटांमुळे अलीकडे पारंपारिक शेती ही तोट्याची शेती म्हणून नावारूपाला येत आहे. मात्र शेतीत पारंपारिक शेती पद्धती यांच्याशी शेती निगडित विविध व्यवसाय व आधुनिक पीक पद्धती यांची योग्य सांगड घालून अधिक उत्पादन वाढवण्यासाठी राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी आपापल्या परिसरनिहाय एकात्मिक शेती पद्धती विकसित केल्या आहेत. 

ज्यात प्रसारित केलेल्या विविध पद्धतींचा उपयोग करून शेतकरी आपल्या पारंपारिक शेतीला समृद्ध करत त्यातून अधिकाधिक नफा मिळवू शकतो. यासाठी आपण आपल्या परिसरातील कृषी विद्यापीठांना भेट देणे गरजेचे असून त्यांच्यामार्फत त्या-त्या परिसराकरिता कोणती एकात्मिक शेती पद्धत योग्य आहे याची माहिती घेऊन त्याचा आपल्या शेतामध्ये अवलंब करणे गरजेचे आहे.

एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे

• अधिक,  शाश्वत, आर्थिक उत्पादकता

• प्रदुषण रहित वातावरण

• नविन तंत्रज्ञानांचा वापर, उर्जेच्या समस्यांचे निराकरण

• वनांचे संरक्षण करणे व फायदेशीर उत्पन्न घेणे 

• संतुलित अन्न सोबत वर्षभरात सतत पैसा मिळणे

• मनुष्य बळ निर्माण होणे किंवा व्यवसाय मिळणे

एकात्मिक शेती पद्धतीद्वारे पिकपद्धती व विविध शेतीशी निगडीत उद्योग यांची खालील प्रमाणे सांगड घालावी

• पीक पद्धती + गाई/म्हशी + गांडुळखत उत्पादन बांधावरील फळझाडे + भाजीपाला

• पीक पद्धती + गाई/म्हशी/किंवा कुक्कुट पालन फळझाडे

• पीक पद्धती + रेशीमशेती/शेत तळ्यातील मत्स पालन

• पीक पद्धती + शेळी/मेंढी/वराह पालन + भाजीपाला

• पीक पद्धती + फुलशेती औषधी वनस्पती शेळी पालन किंवा गाई व म्हशी पालन

हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रशेतकरीबाजारदुग्धव्यवसायफलोत्पादन