महात्मा फुले कृषि विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी महाराष्ट्रातील रब्बीज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. यामुळे उत्पादनात २५% वाढ होते असे आढळून आले आहे.
१) फुले अनुराधा
- अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य, पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस असून अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे.
- या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत उत्कृष्ट आहे.
- या वाणाचे कोरडवाहू मध्ये धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.
२) फुले सुचित्रा
- या वाणाची अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे.
- या जातीस पक्व होण्यास १२० ते १२५ दिवसाचा कालावधी लागतो.
- या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र आहेत.
- भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.
- या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल कोरडवाहूमध्ये मिळते.
- हा वाण अवर्षणास, खडखडया, पानांवरील रोगास खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम आहे.
३) फुले वसुधा
- ही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असून या जातीस ११६ ते १२० दिवस पक्व होण्यास लागतात.
- या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार असतात.
- भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.
- ही जात खोडमाशी व खडखडया रोगास प्रतिकारक्षम आहे.
- या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी २५ ते २८ क्विंटल तर बागायतीसाठी ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- तर कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५ ते ६० क्विंटल तर बागायतीमध्ये ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
४) फुले रेवती
- ही जात भारी जमिनीकरीता बागायतीसाठी विकसीत करण्यात आली आहे.
- या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे, चमकदार असतात.
- भाकरीची चव उत्तम आहे व कडबा अधिक पौष्टीक व पाचक आहे.
- ही जात ११८ ते १२० दिवसात तयार होते.
- या जातीचे धान्य उत्पादन बागायतीसाठी ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- तर कडब्याचे उत्पादन ९० ते १०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
५) फुले मधुर (हुरडा)
- ही जात ज्वारीच्या हुरड्यासाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे.
- या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसात तयार होतो.
- या जातीचे हुरडा उत्पादन ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर व कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- हुरडा चविला उत्कष्ट असुन खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
६) परभणी शक्ती (पीव्हीके-१००९)
- कालावधी: ११५ ते ११८ दिवस
- उत्पादन: १४ ते १५ (ज्वारी) ४५ ते ४६ (कडबा) क्विंटल.
- अधिक लोह (४२ मि.ग्रॅ/किलो बियाणे) व जस्तयुक्त (२५ मि.ग्रॅ/किलो बियाणे) महाराष्ट्र राज्याकरीता प्रसारीत.
७) परभणी सुपर मोती (एसपीव्ही-२४०७)
- कालावधी: ११८ ते १२० दिवस
- उत्पादन: १२ ते १३ (ज्वारी) ४६ ते ४७ (कडबा) क्विंटल.
- खोडमाशी, खोडकिडा व खडखडया रोगास मध्यम सहनशील.
- कडबा व धान्य उत्पादनाकरीता उत्तम व मराठवाडा विभागाकरीता प्रसारीत.
८) परभणी मोती (एसपीव्ही-१४११)
- कालावधी: १२० ते १२५
- उत्पादन: ८ ते ९ (ज्वारी) १५ (कडबा) क्विंटल.
- दाणे टपोरे व मोत्यासारखे चमकदार, भाकरीची प्रत उत्तम.
९) परभणी ज्योती (सीएसव्ही-१८)
- कालावधी: १२५ ते १३०
- उत्पादन: १५ ते १६ (ज्वारी) ३५ ते ३६ (कडबा) क्विंटल.
- मावा किडीस प्रतिकारक्षम, जमीनीवर न लोळणारा वाण, ओलीताखाली घेण्याची शिफारस.
१०) परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-१०१)
- कालावधी: ९५ ते ९८
- उत्पादन: १३ ते १४ (कडबा) ४६ ते ४७ (हिरवा चारा) क्विंटल.
- खोडमाशी, खोडकिडीस मध्यम सहनशील, दाणे मऊ,गोड व कणसा पासून सहज वेगळे होतात, हुरड्यासाठी उत्तम.