Join us

रब्बी ज्वारी पेरणी सुरु होईल लागवडीसाठी निवडा हे टॉप टेन वाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 3:16 PM

Rabi Jowar महात्मा फुले कृषि विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. यामुळे उत्पादनात २५% वाढ होते असे आढळून आले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी महाराष्ट्रातील रब्बीज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. यामुळे उत्पादनात २५% वाढ होते असे आढळून आले आहे.

१) फुले अनुराधा- अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य, पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस असून अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे.या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत उत्कृष्ट आहे.या वाणाचे कोरडवाहू मध्ये धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरी मिळते.

२) फुले सुचित्राया वाणाची अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे.या जातीस पक्व होण्यास १२० ते १२५ दिवसाचा कालावधी लागतो.या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र आहेत.भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल कोरडवाहूमध्ये मिळते.हा वाण अवर्षणास, खडखडया, पानांवरील रोगास खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम आहे.

३) फुले वसुधाही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असून या जातीस ११६ ते १२० दिवस पक्व होण्यास लागतात.या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार असतात.भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.ही जात खोडमाशी व खडखडया रोगास प्रतिकारक्षम आहे.या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी २५ ते २८ क्विंटल तर बागायतीसाठी ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.तर कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५ ते ६० क्विंटल तर बागायतीमध्ये ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

४) फुले रेवतीही जात भारी जमिनीकरीता बागायतीसाठी विकसीत करण्यात आली आहे.या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे, चमकदार असतात.भाकरीची चव उत्तम आहे व कडबा अधिक पौष्टीक व पाचक आहे.ही जात ११८ ते १२० दिवसात तयार होते.या जातीचे धान्य उत्पादन बागायतीसाठी ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.तर कडब्याचे उत्पादन ९० ते १०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

५) फुले मधुर (हुरडा)ही जात ज्वारीच्या हुरड्यासाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे.या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसात तयार होतो.या जातीचे हुरडा उत्पादन ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर व कडब्याचे उत्पादन ६५ ते ७० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.हुरडा चविला उत्कष्ट असुन खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

६) परभणी शक्ती (पीव्हीके-१००९)कालावधी: ११५ ते ११८ दिवसउत्पादन: १४ ते १५ (ज्वारी) ४५ ते ४६ (कडबा) क्विंटल.अधिक लोह (४२ मि.ग्रॅ/किलो बियाणे) व जस्तयुक्त (२५ मि.ग्रॅ/किलो बियाणे) महाराष्ट्र राज्याकरीता प्रसारीत.

७) परभणी सुपर मोती (एसपीव्ही-२४०७)कालावधी: ११८ ते १२० दिवसउत्पादन: १२ ते १३ (ज्वारी) ४६ ते ४७ (कडबा) क्विंटल.खोडमाशी, खोडकिडा व खडखडया रोगास मध्यम सहनशील.कडबा व धान्य उत्पादनाकरीता उत्तम व मराठवाडा विभागाकरीता प्रसारीत.

८) परभणी मोती (एसपीव्ही-१४११)कालावधी: १२० ते १२५उत्पादन: ८ ते ९ (ज्वारी) १५ (कडबा) क्विंटल.दाणे टपोरे व मोत्यासारखे चमकदार, भाकरीची प्रत उत्तम.

९) परभणी ज्योती (सीएसव्ही-१८)- कालावधी: १२५ ते १३०उत्पादन: १५ ते १६ (ज्वारी) ३५ ते ३६ (कडबा) क्विंटल.मावा किडीस प्रतिकारक्षम, जमीनीवर न लोळणारा वाण, ओलीताखाली घेण्याची शिफारस.

१०) परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-१०१)- कालावधी: ९५ ते ९८उत्पादन: १३ ते १४ (कडबा) ४६ ते ४७ (हिरवा चारा) क्विंटल.खोडमाशी, खोडकिडीस मध्यम सहनशील, दाणे मऊ,गोड व कणसा पासून सहज वेगळे होतात, हुरड्यासाठी उत्तम.

टॅग्स :ज्वारीरब्बीपेरणीशेतकरीशेतीपीक