Join us

Ranbhajya : पावसाळ्यात पोषक आहारासाठी कोणत्या रानभाज्या खाल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:09 AM

भारतात विविध स्थानिक रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात. अनेक रोगांपासून लढण्याची नैसर्गिक शक्ती त्यातून मिळते. त्यापैकी काही वनस्पतींना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो.

भारतात विविध स्थानिक रानभाज्या मुबलक प्रमाणात आढळून येतात. अनेक रोगांपासून लढण्याची नैसर्गिक शक्ती त्यातून मिळते. त्यापैकी काही वनस्पतींना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो.

या वनस्पतींमध्ये मानवी शरीरासाठी अत्यावश्यक खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये व अत्यंत उपयोगी रसायने असे अनेक मानवी आरोग्यास पोषक घटक व औषधी गुणधर्मही यात मोठ्या प्रमाणात आढळतात.

फोडशी, अंबूशी, कुरडू, टाकळा, चिवळा, मटारू, फाश्या, फांगळा, पाथरी, शेवूल, तरोटा, लोथ, उळशी, वाघाटी, सफेद मुसळी, रानकेळी, कुरडू, तेरा, केना, माठ, चाई, कुळा, घोळ, कोहरूळचा पाला, भारंगीचा पाला या रानभाज्या, तसेच कटुले, मोहाची फळे, अळीव, भोकरीचे फळे, तोरण, करवंद टेंभुर्णी, गोमटी, वाघाटी ही रानफळे पाहायला मिळतात. 

ऋतुमानानुसार शिरीचे दोडे, तागाड्याची फुले, बहाव्याची फुले, मोहाची फुले, कुडाची फुले, चाईचा मोहर, उलशीचा मोहर अशी अनेक फुले उपलब्ध होतात.

रानभाज्या आणि औषधी गुणधर्म१) करटोलीकाही भागांमध्ये या वनस्पतीचे नाव वेगळे असू शकते. याचे शास्त्रीय नाव 'भौमोर्डिया डायोका' है असून, ही वनस्पती शरीरासाठी अतिशय पोषक असून, तंतुमय घटक असलेली ही वनस्पती प्रथिनांचा आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. उष्मांक मूल्य अतिशय कमी असल्यामुळे मधुमेहींसाठीसुद्धा ही वनस्पती उपयुक्त आहे. यातील तंतुमय घटक आणि प्रतिऑक्सिडीकारकांमुळे पचनक्रियेस चालना देते.

२) चिवळया वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'पोर्चुलेंका क्वार्डीफीडा' हे असून, यात ९० ते ९३ टक्के पाण्याचे प्रमाण व कमी उष्मांक मूल्य असलेल्या या भाजीमध्ये ओमेगा-३ मेदाम्ले आहेत, तसेच यात मुबलक तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ, ब, क या जीवनसत्त्वबरोबरच पचनक्रियेत उपयुक्त ठरणारी लोह, पोटॅशियम, कॅल्शिअम, मॅग्नेशियम ही खनिजे असतात.

३) घोळची भाजीया वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'पोर्चुलँका ओलिरेंसिया' हे असून, महाराष्ट्रात ही भाजी घोळची भाजी याच नावाने प्रसिद्ध आहे. घोळच्या भाजीमध्ये अनेक पोषक घटक, तंतुमय पदार्थ जीवनसत्त्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, तसेच या भाजीत कमी उष्मांक मूल्ययुक्त व कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य टक्के असते. या भाजीमध्ये अ, क ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असून, ही भाजी अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्यही सुधारते, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार घोळच्या भाजीत ऑक्सालिक अॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे मूतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी ही भाजी खाऊ नये.

४) टाकळाची भाजीतण म्हणून शेताच्या बांधावर पावसाळ्यात उगवणाऱ्या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'कॅसिया टोरा' असे असून, टाकळ्याच्या भाजीत चांगल्या प्रमाणात तंतुमय घटक, बीटा कॅरेटीन, जीवनसत्त्व बी १, बी २, क आणि कॅल्शियम, लोह, झिंक या खनिजांसोबत मुबलक प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. या भाजीतील विरेचन द्रव्य रक्तवाढीस पोषक आहे. या भाजीच्या नियमित सेवनाने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

५) अंबाडीची भाजीया भाजीचे शास्त्रीय नाव 'हिबिस्कस सॅबडॅरिफा' हे असून, अंबाडीच्या भाजीत कैल्शियम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व अ आणि क अशा पोषकघटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत म्हणून ही भाजी ओळखली जाते. अंबाडीच्या लाल फुलांतही (बोंड्यामध्ये) पोषक घटक मुबलक असून, त्याची चटणी बनवली जाते.

भारंगीची भाजीया रानभाजीचे शास्त्रीय नाव 'क्लेरोडेंड्रम सेरेंटम' हे असून ही भाजी श्वसनक्रिया उत्तम राहावी आणि दमा होऊ नये, यासाठी कोकणात भारंगीच्या पानांची भाजी खाल्ली जाते. भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर होत असून, ही भाजी सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत अत्यंत लाभदायक ठरत असते. भारंगीची मुळे, फुले यांनासुद्धा आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.

कुंडीत रानभाजी?आता समाजमाध्यमांमुळे फोडशी, कुई, तांदुळजा, माठ, चिवळ, भारंगी, केना या भाज्या आपण ओळखू लागलोय; पण काही भाज्या या अगदीच काही दिवसांसाठी मिळतात. या भाज्या बाजारातून विकत घेता येतीलच, पण आपल्या परस बागेत किंवा आपल्याकडील उपलब्ध जागेत जर या भाज्या लावल्या, तर आपल्याला ताज्या भाज्या घरीच मिळतील. आपल्याच घरच्या कुंडीत, परसदारी हा अमूल्य ठेवा आपल्याला आपल्या स्वतःच्या थोड्याशा मेहनतीत उपलब्ध होऊ शकतो.

प्रा. अदिती सुनील काळेवनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, अभ्यासक, मालेगावaditikale08.ak@gmail.com

टॅग्स :भाज्याशेतीजंगलमहिलाआरोग्यपीक