भारतातील आदिवासी १५०० पेक्षा जास्त वनस्पती दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात, त्यांनाच आपण रानभाज्या म्हणतो. मी शोधून काडलेल्या रानभाज्यांच्या औषधी व पौष्टिक गुणधर्माचा अभ्यास केला आहे. रानभाज्या आदिवासी जमातींनी त्यांच्या उपजीविकेसाठी शोधून काढलेल्या भाज्या आहेत, अनेक पिढ्यांपासून त्या भाज्या खाण्याची परंपरा त्यांनी जपलेली आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी हे महाराष्ट्रातील आदिवासी हे अल्पभूधारक आहेत. आदिवासी त्यांच्या जमिनीत प्रामुख्याने भात, नागली, वरी यासारखी तृणधान्य पिकवितात. त्यांच्या जमिनीत जे धान्य पिकते ते त्यांना वर्षभर पुरत नाही, त्यामुळे त्यांना वर्षातून काही दिवस अर्धपोटी राहावे लागते व त्यामुळे कुपोषणाची समस्या निर्माण होते.
आदिवासींच्या आर्थिक जीवनात पिकविलेले धान्य वर्षभर पुरत नाही, त्यामुळे त्यांना अर्धपोटी उपाशी राहावं लागतं. त्यामुळे कुपोषणाची ही समस्या निर्माण होते.
आदिवासींच्या आर्थिक जीवनात जमिनीच्या खालोखाल दुसरं कुठलं स्थान असेल, तर त्याही जंगलांचंजंगलातील फळे, डिंक, मध, रिठे, पळसाची पाने, आपट्याची पाने, लाकडाच्या मोळ्या गोळा करून गावच्या आठवडी बाजारामध्ये विकून या वस्तू विनिमय करून उपजीविका करतात.
पावसाळ्यामध्ये जंगलातील रानभाज्या, कंदमुळे यांचा वापर खाण्यासाठी व थोड्या प्रमाणात विक्रीसाठी करीत असतात. कारण पावसाळ्याच्या काळात भाताची लागवड झाल्यावर त्यांना काम नसते. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड त्यामुळे त्यांना जंगलामधून मिळणारे उत्पन्न फार कमी झालेले आहे.
रानभाज्यांचे संशोधन करून महाराष्ट्रात एकूण १०८ कंदवर्गीय, वेलवर्गीय, फळभाज्या व रानभाज्यांची नोंद केलेली आहे. परंतु, प्रत्येक डोंगराळ भागात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात.
उदा. शेवाळी, काकड, बापली, टाकळा, कोरेल नळीची भाजी, मायाळू, कपाळ फोडी, आवळा, भोकर, काठेमाळ, कंटोळी, आघाडी, हादगा, शेवगा, रानकंद करांदे, कोली, अंबाडी, शिंद, आदी रानभाज्या पालघर जिल्ह्यामध्ये, गारगाव गावातील परिसरामध्ये उपलब्ध होतात. त्यापैकी काही रानभाज्यांचा अभ्यास केला आहे.
आदिवासींच्या रानभाज्या व त्यांचे उपयोगअ) कंदवर्गीय भाज्या१) रान सुरण : (Amorphophallus paeoniflorins) रान सुरण उकडून त्याचा भाजीमध्ये वापर केला जातो. (बटाट्यासारखा)उपयोग : मूळव्याधीवर उपयुक्त आहे, तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण (कोलेस्ट्रॉल) कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
२) शेवळा : (Amorphophallus commutates) शेवळ्याची भाजी पानांची व कंदाची केली जाते. शेवळ्याला खाजरेपणा असल्यामुळे त्या भाजीमध्ये काकड (रान आवळ्ळ्यासारखे) याचा रस काढून भाजीत घालतात.उपयोग : मूत्रमार्गात लघवीसाठी अडथळा येत असल्यास शेवाळ्याच्या पानांचा रस दूध साखर घालून देतात.
ब) वेलवर्गीय वनस्पतीमायाळू : मायाळूच्या पानांचा वापर भाजी करण्यासाठी केला जातो.उपयोग :सांध्यामधील वेदनेसाठी व सूज कमी करण्यासाठी लाभदायक.रक्त विकारांमध्ये रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त.पित्तनाशक असून, त्वचारोग आमांश, व्रण यावर गुणकारी.मादक ज्वरनाशक आणि पौष्टिक आहे.केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त आहे.
फळभाज्याकंटोळी (करटोली) ही फळभाजी असून, याचा जमिनीमध्ये कंद असतो, फळ थोडे कडू असतेउपयोग :फळ थंड, रोगसंसर्गापासून रक्षण करणारे आहे.यात कुष्ठरोग मूत्र स्राव यावर उपयोगी आहे.डोकेदुखीसाठी पानांचा रस उपयोगी.मूतखडा, विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात.भाजलेले कंद मूळव्याधीचा रक्तस्राव थांबविण्यासाठी व आतड्यांच्या विकारासाठी उपयोगी आहे.
हादगा : हादग्याच्या पानाफुलांचा व शेंगांचा भाजीसाठी उपयोग होतो.उपयोग वातदोष कमी होण्यास उपयुक्त.भूक लागत नसल्यास, तसेच पोट साफ होत नसल्यास अत्यंत गुणकारी.स्त्रियांची मासिक पाळी नियमित होण्यासाठी, तसेच मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासावर उपयुक्त.रातांधळेपणावर उपयोगी आहे.
आघाडा : आघाड्याच्या छोट्या रोपांच्या पानांची भाजी केली जाते.उपयोग :मुळांचा रस सर्पदंशावर, खोकला व कफ यावर उपयुक्त आहे.रातांधळेपणा व दंत रोगावर उपयोगी आहे.जेवणापूर्वी आघाड्याचा काढा घेतल्यास पाचक रस वाढतो व जेवल्यावर घेतल्यास आम्ल कमी होते.मूळव्याध, मूतखडा, हृदयरोग, अपचन, अमांश, रक्त रोग, आदी विकारांवर उपयुक्त आहे.
रानभाज्यांमधील पौष्टिकता व उपयुक्तता■ सर्व तन्हेच्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्व 'अ' 'ब' व लोह मोठ्या प्रमाणावर असते. शेवग्याच्या पानात जीवनसत्वे 'अ' 'क' व लोह भरपूर प्रमाणात असतात. पालेभाज्यांच्या जाड देठात विरघळणारा फायबर फार मोठ्या प्रमाणात असतो.■ रानभाज्यामध्ये प्रथिने कमी असतात. खनिजे भरपूर प्रमाणात असतात तसेच फॉलिक अॅसिड असते. त्यांच्यात भरपूर प्रमाणात चोथा असल्यामुळे पोट साफ ठेवण्यास मदत होते. बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी होते.■ आहारातील 'अ 'जीवनसत्व Antioxidant असल्यामुळे कर्करोग, बंडू रोग, हृदयरोग, मोतीबिंदू यासारखे होणारे रोग यांचा धोका कमी असतो.■ राणावळा, रान शेवगा यामध्ये जीवनसत्व 'क' व लोह भरपूर प्रमाणात असतात. शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व व 'क' व लोह भरपूर प्रमाणात असतात. आवळ्यात तर 'क' जीवनसत्व एवढ्या मोठ्या प्रमाणात असते.■ प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर होत आहे याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात कर्करोग, हृदयरोग यासारखे गंभीर आजार होतात.■ संशोधनाने असे दाखवून दिले आहे की जीवनसत्व 'अ' क 'ई' आणि अँटिऑक्सिडंट असल्यामुळे प्रदूषणामुळे शरीरात झालेल्या दुष्परिणामांचा मुकाबला या भाज्या करू शकतात. रानभाज्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.