Join us

हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:53 IST

हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पाणी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.

रबी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांमध्ये हरभरा हे सर्वात महत्वाचे पीक असून राज्याच्या एकूण कडधान्य उत्पादनात या पिकाचा ६३ टक्के वाटा आहे.

हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पाणी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. 

हरभरा पिकास कशा द्याल पाण्याच्या पाळ्या?१) जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.२) मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.३) भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्याकरिता ३० - ३५ दिवसांनी पहिले व ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.४) प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो.५) स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत.६) पीक फुलोऱ्यात असताना पिकास पाण्याचा ताण जाणवत असेल व पाणी देण्याची सोय नसेल त्यावेळेस २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यांनतर घाठ्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत २ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

हरभरा पिकात तुषार सिंचन फायदेशीर Sprinkler Irrigation in Chick Pea१) हरभरा पिकास Tushar Sinchan तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते.२) हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पध्दत आहे.३) तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते.४) पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते.५) नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते.६) तुषार सिंचनाने पाणी ठराविक प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

अधिक वाचा: Gahu Pani Niyojan : गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कशा व किती लागतात पाण्याच्या पाळ्या

टॅग्स :हरभरापाणीशेतीपीक व्यवस्थापनरब्बीपीक