Join us

डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरची आली ही नवीन बायोफोर्टीफाइड जात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 11:16 AM

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया.

सोलापूर लाल ची वैशिष्ट्ये- सोलापूर लाल ही जात बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात आहे.- त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह (५.६-६.१ मिग्रॅ/१००ग्रॅ. दाणे), जस्त (०.६४-०.६९ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे), अॅन्थोसाइनिन (३८५-३९५ मिग्रॅ/१०० ग्रॅ दाणे) आणि जीवनसत्तव क (१९.४- १९.८ मिग्रॅ/१००ग्रॅ दाणे), हे गडद लाल, जास्त टीएसएस (१७.५-१७.७ डिग्री बीक्स) इ.- फळ उत्पादकता (२३-२७ टन हे.)- टपोरे दाणे आहेत.- खाण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी ही जात अत्यंत योग्य आहेत.- फुल धारणेनंतर सोलापूर लाल ही प्रजाती १६५ दिवसांनी परिपक्व होते.- वेगवेगळ्या वातावरणाच्या आणि हाताळणीच्या पद्धती अंतर्गत याचा कालावधी वेगवेगळा येवू शेकतो.

या जातीला बायोफोर्टीफाइड (Biofortified) का म्हटले जाते?ज्या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणद्रव्ये, प्रामुख्याने, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी. त्याच्या खाण्याच्या भागात असतात त्याला बायोफोर्टीफाइड (Biofortified) प्रजाती असे म्हणतात. मानवी जीवनातील कुपोषणाची कमतरता भरुन काढण्याचे प्रमुख कार्य बायोफोर्टीफाइड (Biofortified) प्रजाती करतात.

सोलापूर लाल आणि भगवा यातील फरक१) सोलापुर लाल ही प्रजाती बायोफोर्टीफाइड प्रजाती आहे. आणि भगव्याच्या तुलनेत ही गडद लाल, जास्त टीएसएस, फळ उत्पादन, लोह, जस्त, अॅन्थोसायनीन आणि जीवनसत्व क असलेली त्याबरोबरच टपोरे दाणे, प्रक्रिया उद्योगासाठी व खाण्यासाठी अत्यंत योग्य आहे.२) सोलापूर लाल ही प्रजाती फुल धारणेनंतर १६५ दिवसांनी परिपक्व होते तर भगवा फुल धारणेनंतर १८० दिवसांनी परिपक्व होतो. म्हणजे सोलापूर लाल ही भगवाच्या तुलनेत १५ दिवसांनी लवकर पक्व होतो.

अधिक वाचा: डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

टॅग्स :डाळिंबलागवड, मशागतपीकफलोत्पादनफळेसोलापूरआरोग्य