Lokmat Agro >स्मार्ट शेती > कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

Remedies for excess vegetative growth, leaf and flower drop, red leaf in cotton | कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते.

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते.

शेअर :

Join us
Join usNext

१) कपाशीतील कायीक वाढ
भारी जमिनीत रासायनिक खते व पाणी जास्त दिल्याने बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायीक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते आणि बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो.
उपाययोजना
पीक ८० ते ९० दिवसाचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडावा.
यामुळे पिकाची कायीक वाढ मर्यादित राहते, सर्व बोंडाची वाढ चांगली होते.
पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो.

२) पाते, फुले आणि बोंडे यांची गळ
हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते.
उपाययोजना
नॅपथालिन ऍसिटिक ऍसिड (एन. ए. ए.) म्हणजेच प्लॅनोफिक्स या संजीवकाची हेक्‍टरी १०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून पाते लागताना पहिली व त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामुळे उत्पादनात १०% वाढ होते.

३) कपाशीवरील लाल्या
लाल्या हा रोग नसून एक विकृती आहे. नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींचा (तुडतुडे) प्रादुर्भाव, बोंड वाढीच्या अवस्थेत पानातील हरितद्रव्यातील नत्राचा वापर या कारणांमुळे कपाशीची पाने लाल होतात.
उपाययोजना
- शिफारशीत खते वेळेवर द्यावीत.
- बीटी वाणांसाठी शिफारशीत मात्रेपेक्षा २५% जास्त खते द्यावीत.
मॅग्नेशियम सल्फेट, हेक्टरी २० ते ३० किलो जमिनीतून द्यावे.
कपाशीच्या वाढीच्या काळात २% (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) डीएपी खताच्या १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

संकलन
डॉ. कल्याण देवळाणकर

सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ

Web Title: Remedies for excess vegetative growth, leaf and flower drop, red leaf in cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.