Join us

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:21 PM

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते.

१) कपाशीतील कायीक वाढभारी जमिनीत रासायनिक खते व पाणी जास्त दिल्याने बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायीक वाढ जास्त होते, त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते आणि बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो.उपाययोजना- पीक ८० ते ९० दिवसाचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडावा.यामुळे पिकाची कायीक वाढ मर्यादित राहते, सर्व बोंडाची वाढ चांगली होते.पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भावही कमी होतो.

२) पाते, फुले आणि बोंडे यांची गळहवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते.उपाययोजनानॅपथालिन ऍसिटिक ऍसिड (एन. ए. ए.) म्हणजेच प्लॅनोफिक्स या संजीवकाची हेक्‍टरी १०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून पाते लागताना पहिली व त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. यामुळे उत्पादनात १०% वाढ होते.

३) कपाशीवरील लाल्यालाल्या हा रोग नसून एक विकृती आहे. नत्राची कमतरता, मॅग्नेशियमची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडींचा (तुडतुडे) प्रादुर्भाव, बोंड वाढीच्या अवस्थेत पानातील हरितद्रव्यातील नत्राचा वापर या कारणांमुळे कपाशीची पाने लाल होतात.उपाययोजना- शिफारशीत खते वेळेवर द्यावीत.- बीटी वाणांसाठी शिफारशीत मात्रेपेक्षा २५% जास्त खते द्यावीत.मॅग्नेशियम सल्फेट, हेक्टरी २० ते ३० किलो जमिनीतून द्यावे.कपाशीच्या वाढीच्या काळात २% (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) डीएपी खताच्या १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

संकलनडॉ. कल्याण देवळाणकरसेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ

टॅग्स :कापूसपीकशेतकरीशेतीकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापन