महावितरणच्या सर्व विज ग्राहकांना सुचीत करण्यात येते की, आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा व विज बिलापासून मुक्त व्हा. सोलर पॅनलला लागणारा खर्च ५ वर्षात वसूल होईल सोबतच पर्यावरणाचे रक्षण व पैशाची बचत देखील होईल.
महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा र्निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात बचत होणार आहे. तर नेटमीटरिंग द्वारे महावितरण कडून वर्ष अखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे. यात शेतकरी, महिला शेतकरी उद्योग तसेच शेतकरी उत्पादक कंपनी सहभागी होऊ शकतात.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगा वॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलो वॉट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साह्य देण्यात येणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये१) घरगुती बिलात मोठी बचत.२) घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ.३) १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान.४) ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान.५) सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान.६) शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार.
रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ
रूफ टॉप सोलर सिस्टिम क्षमता (किलो वॅट) | अंदाजे खर्च (रुपये) | अनुदान (रुपये) | प्रत्यक्ष खर्च (रुपये) | छतावरील लागणारी जागा | दरमहा होणारी वीजनिर्मिती | प्रति यूनिट ८ रुपये दराने होणारी बचत |
१ | ५२,००० | १८,००० | ३४,५०० | १०० चौ.फु. | १२० युनिट | ९६० |
२ | १,०५,००० | ३६,००० | ६९,००० | २०० चौ.फु. | २४० युनिट | १,९२० |
३ | १,५७,००० | ५४,००० | १,०३,००० | ३०० चौ.फु. | ३६० युनिट | २,८८० |
अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयात किंवा https://www.mahadiscom.in/ismart/ किंवा https://solarrooftop.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा १८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५ या क्रमांकावर support_solarrf@mahadiscom.in (माहिती तंत्रज्ञान विषयी शंकेसाठी) certsho.msedcl@yahoo.com (तांत्रिक शंकेसाठी) येथे संपर्क साधा.
रुफ टॉप सोलर योजेन सहभागी होणायासाठी https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या लिंकवर अर्ज करा.