राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.
योजनेचे उद्देश
१) भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
२) रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.
३) पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
४) शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.
योजनेची व्याप्ती व उद्दिष्ट
राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटीका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ८२२ लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात येत आलेले आहे. प्रत्येक तालुक्यास किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावित आहे.
लाभार्थी निवड
१) अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हे. जमीन असणे आवश्यक आहे.
२) रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम
१) महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील.
२) महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल.
३) भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.
समाविष्ट घटक
टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इत्यादी व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटीकेची उभारणी करण्यात यावी. यामध्ये रोपवाटीकेची उभारणी करावयाचे घटक व प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | घटक | क्षेत्र/संख्या | मापदंड (रु.) | प्रकल्प खर्च | अनुदान रक्कम |
१ | ३.२५ मी. उंचीचे Flat Type शेडनेट गृह (सांगाडा उभारणी) | १००० चौ.मी | ४७५ प्रति चौ.मी. | ४,७५,००० | २,३७,५०० |
२ | प्लॅस्टिक टनेल | १००० चौ.मी | ६० प्रति चौ.मी. | ६०,००० | ३०,००० |
३ | पॉवर नॅपसॅक स्प्रेअर | १ | ७,६०० | ७,६०० | ३,८०० |
४ | प्लास्टिक क्रेटस् | ६२ | २०० | १२,४०० | ६,२०० |
एकूण | ५,५५,००० | २,७७,५०० |
योजनेच्या अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्या.
अधिक वाचा: Hydroponics Farming : मातीविना कमी जागेत करता येते या नवीन तंत्राने शेती.. वाचा सविस्तर