Join us

सांगलीचा मिरजपूर्व भाग ठरतोय खाऊच्या पानांचा आगार, कशी करतात पानांची शेती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:04 AM

मिरज तालुक्यातील पूर्व लोकमत न्यूज नेटवर्क भाग पानांचा आगार बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात म्हणजे मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगाव, आरग आदी भागांतून २५० हेक्टर क्षेत्रावर जिगरबाज शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे पानमळे फुलविले आहेत.

दिलीप कुंभारनरवाड : मिरज तालुक्यातील पूर्व लोकमत न्यूज नेटवर्क भाग पानांचा आगार बनत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात म्हणजे मिरज तालुक्यातील नरवाड, बेडग, मालगाव, आरग आदी भागांतून २५० हेक्टर क्षेत्रावर जिगरबाज शेतकऱ्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे पानमळे फुलविले आहेत.

पानमळ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी वरदान ठरत असून, शेतकऱ्यांनी शेततळी खोदून त्यात पाणी साठवून ठिबक सिंचनाद्वारे पानमळ्यावर संसाराचा गाडा चालविला आहे. पानमळ्याचा सिझन जून ते फेब्रुवारीदरम्यान जोरात चालतो. किमान २१ दिवसांनी पानांचा खुडा केला जातो. हा खडा दोन प्रतीत केला जातो.

कळी व फापडा या त्या दोन प्रती आहेत. पानमळा लागवडीसाठी कपुरी जातीच्या कलमांची (बियाणांची) लागवड केली आहे. पानमळ्यांना शक्यतो ढगाळ हवामान व रिमझिम पावसाची गरज असते. यावेळी पानांची जोरदार वाढ होताना दिसते.

एक कवळी ३०० पानांची असते. १० कवळ्यांच्या म्हणजे ३ हजार पानांच्या एका डप्प्यास (गठ्ठा) पान बाजारात किमान ३०० ते ८०० रुपये दर मिळतो. यामध्ये पानांचा खुडा करणाऱ्याला १५० रुपये, अडत व कमिशन १० टक्के, याशिवाय हमाली मिळून २५० रुपये खर्च येतो. येथील खाऊची पाने पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर, लांजा, कोल्हापूर, फोंडा, पनवेल, खेड, पुणे, मुंबई, गुजरात आदी पान बाजारपेठांना पाठविला जात आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीसांगलीमिरजपीक