Join us

Santra Pik Vima 2024 : संत्रा फळ पिकासाठी अंबिया बहाराकरिता कसा भराल विमा अन् किती मिळेल मदत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 4:13 PM

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे.

सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत.

मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (‍रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. 

संत्रा पिकासाठी प्रती हेक्टर संरक्षित रक्कम रु. आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे

 संरक्षित रक्कम रु.शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रु.
नियमित विमा१,००,०००/-५,०००/- ते १२,०००/-
गारपीट३३,०००/-१,६५०/- ते २,८०५/-

हवामान धोका व कालावधी व प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर रु.)

१) अवेळी पाऊस (दि. ०१ डिसेंबर ते १५ जानेवारी)या कालावधीमध्ये सलग ७ दिवसात एकूण ३० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २५,०००/- देय होईल. 

२) कमी तापमान (दि. १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी)या कालावधीमध्ये सलग ३ दिवस १२ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. २५,०००/- देय होईल.

३) जादा तापमान (दि. १ मार्च ते ३१ मार्च)या कालावधीमध्ये सलग ३ दिवस ४० डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. २५,०००/- देय होईल.

४) जादा तापमान (दि. १ एप्रिल ते ३१ मे)या कालावधीमध्ये सलग ३ दिवस ४५ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. २५,०००/- देय होईल.   

गारपीटसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल

विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२४

संपर्कशेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Us Lagwad : उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड तंत्रात करा हे बदल

टॅग्स :पीक विमाफळेपाऊसफलोत्पादनतापमानहवामानपीक