सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यात जमिन खरेदी-विक्री, वारस इतर हक्कात विहीर, पाण्याच्या पाळ्या यांची नोदन ठेवली जाते.
राज्य सरकारच्यामहसूल विभागाने तब्बल ५० वर्षानंतर सातबाऱ्यात महत्वाचे बदल केले आहे. सातबारा उताऱ्यात स्पष्टता आणि अचुकता निर्माण होण्यासाठी हे महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
महसूल विभागाकडून करण्यात आलेले ११ महत्वाचे बदल१) गाव नमुना 7 मध्ये गावाचा नावासोबत कोड क्रमांक.२) लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार.३) शेतीसाठी 'हेक्टर आर चौरस मीटर' तर बिनशेतीसाठी 'आर चौरस मीटर' नवीन मापन पद्धत वापरणार.४) यापूर्वी "इतर हक्क" मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार.५) मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार.६) फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी 'प्रलंबित फेरफार' स्वतंत्र रकाना असणार.७) सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार केला जाणार.८) दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार.९) गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार.१०) बिनशेती क्षेत्रासाठी 'आर चौरस मीटर' हेच एकक, जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेत.११) बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार.
अधिक वाचा: Hakka Sod Patra : हक्कसोडपत्र केले परंतु नाव कमी झाले नाही; कशामुळे? वाचा सविस्तर