Lokmat Agro >स्मार्ट शेती > उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

Select improved varieties from Udid crops and get high yields | उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी.

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी.

शेअर :

Join us
Join usNext

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये टपोरे दाणे असलेले, रोग प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणारा वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहे.

१) बी डी यु-१
-
हा वाण कृ.सं. कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथुन २००१ मध्ये प्रसारीत करण्यात आला आहे.
हे वाण भुरी रोगास प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी शिफारस केले आहे.
दाणे हे मध्यम, काळया रंगाचे व टपोरे असून १०० दाण्यांचे वजन ४.५ ते ५.० ग्रॅम एवढे असते या वाणांमध्ये प्रथिनाचे प्रमाण १९ टक्के इतके असून ७० ते ७५ दिवसांत काढणीस येते.
हे वाण मध्यम उंच वाढणारे असून पाने अरुंद व खोड जाभळ्या रंगाचे असते.
शेंगा या काळया व थोपडया असून त्यावर कमी प्रमाणात लव असतो.
या वाणाचे सरासरी उत्पादन ११-१२ क्विंटल प्रति हेक्टरी भेटते.

२) टी ए यु-१
-
हा वाण डॉ.प.दे.कृ.वि. अकोला व बी.ए. आर.सी मुबंई यांनी संयुक्तपणे १९८५ मध्ये प्रसारीत केला आहे.
हे वाण ७० ते ७५ दिवसात काढणीस तयार होतो.
हे वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.
शेंग काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे व काळे रंगाचे असुन १०० दाण्याचे वजन ३.५ ते ३.८ ग्रॅम इतके असते.
या वाणांमध्ये १९ ते २ टक्के प्रथिने आढळून येते.
या वाणाचे सरासरी उत्पादन १०-१२ क्विंटल प्रति हेक्टरी आहे.

३) टी पी यु-४
हा वाण ६५ ते ७० दिवसामध्ये काढणीस तयार होते.
हे वाण लवकर तयार होणारे असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस केले आहे.
या वाणाचे दाणे काळे टपोरे आहेत.
प्रति हेक्टरी उत्पादन १०-११ क्विंटल प्रति हेक्टरी आहे.

अधिक वाचा: Soybean Variety: हे आहेत सोयाबीनचे टॉप १० फेमस वाण, तुम्ही कुठले पेरणार?

Web Title: Select improved varieties from Udid crops and get high yields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.