Join us

Sericulture Farming : रेशीम उद्योगात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुतीच्या 'या' सुधारित जातींची आत्ताच लागवड करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 4:27 PM

रेशीम कीटकांचे (Sericulture) एकमेव खाद्य म्हणजे तुतीची पाने (mulberry leaves). रेशीम उद्योगात तुतीच्या पानांचे महत्व मोठे आहे. कारण पानांच्या गुणवत्तेचा (quality) आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर (Cocoon production) होतो. त्यामुळे दर्जेदार तुती पाला नियमितपणे उपलब्ध करणे आवश्यक आहे.

रेशीम कीटकांचे एकमेव खाद्य म्हणजे तुतीची पाने. रेशीम उद्योगात तुतीच्या पानांचे महत्व मोठे आहे, कारण पानांच्या गुणवत्तेचा आणि प्रमाणाचा थेट परिणाम कोष उत्पादनावर होतो. त्यामुळे दर्जेदार तुती पाला नियमितपणे उपलब्ध करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी विविध तुतीच्या जातींची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये व्हिक्टरी-१ (V-1), एस-३६(S-36), जी-४ (G-4), जी-२ (G-2) आणि एजीबी ८ (AGB8) या सुधारित जातींचा समावेश आहे.

या जाती उच्च उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होऊ शकते. योग्य लागवड आणि व्यवस्थापनामुळे या जातींचा उपयोग रेशीम उद्योगाच्या विकासासाठी करण्यात येतो.

एस - ३६

- बाल्य रेशीम अळी (चॉकी) साठी उपयुक्त.- पौष्टिक पाने, साधा हिरवट झाड.- चकचकीत, गुळगुळीत पाने, मोठ्या बोटीच्या आकाराची.- राखाडी गुलाबी खोड, मध्यम फांद्या.- प्रति हेक्टरी ४०-४२ हजार किलो उत्पादन, मुळ फुटण्याचे प्रमाण ४८%.

व्हिक्टरी - १

- केंद्रीय रेशीम संस्थानाने विकसित.- सरळ, जाड, रसरशीत पाने.- उच्च मुळधारण क्षमता आणि जलद वाढ.- प्रौढ रेशीम अळ्यांसाठी योग्य, महाराष्ट्रात लोकप्रिय.

एजीबी ८ (AGB८)

- संकरित जात, अर्ध-शुष्क प्रदेशासाठी.- हेक्टरी ४७ मेट्रिक टन पानांचे उत्पादन.- ताठ शाखा, जाड गडद हिरवी पाने, उच्च मूळ धारण क्षमता.

जी-२

- उच्च उत्पादन देणारी जात, चॉकीसाठी योग्य.- प्रति हेक्टरी ३८ मेट्रिक टन उत्पादन.- एस-३६ पेक्षा ३३%, व्ही-१ पेक्षा २०% जास्त उत्पादन.

जी-४

- सुधारित जात, प्रौढ अळ्यांसाठी योग्य.- प्रति हेक्टरी ६५ मेट्रिक टन उत्पादन.- जाड, गडद हिरवी, चकचकीत पाने, ताठ फांद्या.

सौजन्य - रेशीम बोर्ड भारत सरकार.

हेही वाचा : Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी

टॅग्स :रेशीमशेतीशेतीशेती क्षेत्रशेतकरीबाजार