Lokmat Agro >स्मार्ट शेती > चुनखडीच्या जमिनीत ऊस पिकाचे नियोजन कसे करावे?

चुनखडीच्या जमिनीत ऊस पिकाचे नियोजन कसे करावे?

sericulture farminh silk uzi fly management shed farmer silk farming silk warm | चुनखडीच्या जमिनीत ऊस पिकाचे नियोजन कसे करावे?

चुनखडीच्या जमिनीत ऊस पिकाचे नियोजन कसे करावे?

या माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

या माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

शेअर :

Join us
Join usNext

उस शेती करताना चुनखडीची जमीन असेल तर उसाच्या उत्पादनावर परिणाम होतो. तर इतर पिकांनाही चुनखडीच्या मातीमुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. जर आपण चुनखडीच्या जमिनीमध्ये उसाचे पीक घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. त्याचबरोबर रासायनिक खताची कार्यक्षमता कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

चुनखडीच्या जमिनीमध्ये जे रासायनिक खते टाकले जातात ते खते मातीमध्ये फिक्स होतात. तर अशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट न वापरता डीएपी चा वापर करावा. त्याचबरोबर डीएपी आणि अमोनियम सल्फेट याचाही एकत्रितपणे वापर केल्यास त्याचा फायदा होतो. त्यामुळे मातीमध्ये असलेल्या चुनखडीची दाहकता कमी होऊन आपल्याला उसाचे उत्पादन चांगल्या पद्धतीचे येऊ शकते. 

दरम्यान, युरिया, अमोनियम सल्फेट ही दोन खते आणि सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी डीएपी, एमओपी आणि एसओपी चा वापर केला तर चुनखडीच्या जमिनीमध्ये उसाचे चांगले उत्पादन येऊ शकते. त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू अडीच लिटर प्रति हेक्टर आणि पालाश विरघळणारे जिवाणू अडीच लिटर प्रति हेक्टर वापरल्याच चांगला रिझल्ट मिळेल. 

चुनखडीच्या जमिनीमध्ये अशाप्रकारे रासायनिक आणि जैविक खतांचा वापर केला तर चुनखडीची दहकता कमी होते आणि उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या खतांचा वापर शेतीमध्ये करावा.

माहिती संदर्भ - डॉ. समाधान सुरवसे (वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट)

Web Title: sericulture farminh silk uzi fly management shed farmer silk farming silk warm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.