Lokmat Agro >स्मार्ट शेती > Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

Sharbati Gahu : Sharbati Gahu should be sown? These are the top five varieties read in detail | Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात रब्बी हंगामात गहू लागवडीखाली जवळपास ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते मात्र पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते.

अशा परिस्थितीत गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

गव्हाचे सुधारित वाण
१) एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)

परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस) १०५ ते १०८.
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) जिराईत १६ ते १८.
जिरायत/कोरडवाहूसाठी शिफारस.
वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम.

२) एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान)
परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०.
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (मर्यादित सिंचन)
वैशिष्ट्ये: बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस, मर्यादित सिंचनाखाली प्रतिसाद देणारा वाण, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता.

३) फुले अनुपम (एन.आय.ए.डब्लू. ३६२४)
परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०.
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३०-३५ (एका ओलिताखाली)
वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम.

४) फुले सात्विक (एन. आय. ए.डब्लू. ३१७०)
परीपक्व होण्याचा कालावधी १०३-१०८.
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (एका ओलिताखाली)
वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त, तांबेरा प्रतिकारक.

५) एन. आय. ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)
परीपक्व होण्याचा कालावधी १०८ ते १११.
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) (मर्यादित सिंचन) २५ ते २८.
वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम.

Web Title: Sharbati Gahu : Sharbati Gahu should be sown? These are the top five varieties read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.