Lokmat Agro >स्मार्ट शेती > Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

Shetkari Yojana: Farmers.. Apply for these schemes and you will get subsidy of up to two and a half lakhs | Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान

अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती सुधारणेसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करायचा आहे.

केंद्र व राज्य सरकार विविध समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. त्यासाठी अगोदर ऑफलाइन अर्ज मागणी केली जात होती. मात्र, अलीकडे ऑनलाईन प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे. आता शेतकरी व इतर कोणताही घटक लाभाच्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

योजनेतील घटक
■ नवीन विहीर - अडीच लाख रुपये
■ जुनी विहीर दुरुस्त - ५० हजार रुपये
■ इनवेल बोअरिंग - २० हजार रुपये
■ पंप संच - २० हजार रुपये
■ वीज जोडणी आकार - १० हजार
■ शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण - एक लाख रुपये
■ ठिबक सिंचन - ५० हजार
■ तुषार संच - २५ हजार
■ परसबाग - ५ हजार रुपये
■ पीव्हीसी पाइप - ३० हजार रुपये

लाभासाठीचे निकष
-
अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असावा.
सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र असावे.
तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला. 
आधार कार्ड, बँक पासबुक असावे.
स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर जमीन. 
ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी व्यतिरिक्त इतर लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकडे ०.२० हेक्टर शेतजमीन असावी. कमाल ६ हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी.

महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच (ठिबकसिंचन संच, तुषार सिंचन संच), परसबाग, पीव्हीसी पाइप आदींसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

अधिक वाचा: Amarvel अमरवेल या तणाचा बंदोबस्त करण्याचे हे आहेत सोपे उपाय

Web Title: Shetkari Yojana: Farmers.. Apply for these schemes and you will get subsidy of up to two and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.