Lokmat Agro >स्मार्ट शेती > स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

Simple method of making super phospho compost organic phosphorus rich fertilizer at home level | स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो.

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही.

याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो. यात सर्वसाधारण शेणखताच्या तुलनेत नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त असते.

साहित्य
आपल्या शेतावर उपलब्ध असलेल्या पिक अवशेषापासून जसे की गव्हाचा काडा, ऊसाचे पाचट, बाजरीचा भुगा, कोकणात उपलब्ध असलेला भाताचे काड किंवा तुर, सोयाबीन, हरभरा इ. पिक अवशेष. शेण, कुळविण्यासाठी कल्चर.

कृती
• लांबी- ९ ते १० फुट, रुंदी- ५ ते ६ फुट व खोली २ फुट या आकारमानाचा खड्डा करुन घ्यावा.
• त्यावर पॉलीथिन किंवा कालबाह्य बॅनर (सहज व स्वस्त उपलब्ध असलेले) ह्या खड्ड्यामध्ये जमिनीच्या वर १ फुटापर्यंत अंथरुन घ्यावे.
• यावर ४ ते ५ क्विंटल गव्हाचे काड, बाजरी, भात, ऊसाचे पाचट, तुर, सोयाबीन यांचे मिश्रण अथवा फक्त एकाच प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकावे. यावर १०० ते १५० किलो शेण टाकावे.
• कुजविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर होण्याकरिता जवळच्या कृषि विद्यापीठात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या बुरशीचे मिश्रण की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा पॅसीलोमाइस फ्युझीस्पोरस व अॅस्परजीलस अवमोरी इत्यादी असते हे १ किलो कल्चर वरील मिश्रणामध्ये टाकावे.
• हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यावेत.
• उच्च प्रतीचा स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्यासाठी १०० ते १२० किलो रॉक फॉस्फेट (१२ ते २० टक्के पर्यंत) व ५०० मिली द्रवरुप किंवा १ किलो घनरूप स्फुरद विरघळविणारे जिवाणूंचे मिश्रण या सर्व तयार केलेल्या सेंद्रिय पदार्थ व शेणावर टाकुन पुन्हा मिसळून घ्यावे.
• दर १५ दिवसांनी सर्व मिश्रण वर खाली करुन एकत्र मिसळून घ्यावे जेणेकरुन कुजण्याची प्रक्रिया एकसमान वेगाने होईल.
• ९० दिवसानंतर चांगल्या प्रतिचे फॉस्फो कंपोस्ट तयार होईल.

फायदा
स्फुरदयुक्त सेंद्रिय खत (फॉस्फो कंपोस्ट) खताचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

अधिक वाचा: आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन

Web Title: Simple method of making super phospho compost organic phosphorus rich fertilizer at home level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.